घरमुंबईथिएटरमध्ये बंद बालनाट्य आता मंत्रालयात सहाव्या मजल्यावर सुरू - आशीष शेलार

थिएटरमध्ये बंद बालनाट्य आता मंत्रालयात सहाव्या मजल्यावर सुरू – आशीष शेलार

Subscribe

कांजुरमार्ग कारशेडच्या निमित्ताने उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर विरोधकांनी मात्र राज्य सरकारच्या हट्टीपणावर जोरदार टीका केली आहे. आजच्या उच्च न्यायालयाच्या कांजुरमार्ग कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याच्या निर्णयानंतर मुंबईकरांचे आणखी किती नुकसान करणार अशी प्रतिक्रिया विरोधकांकडून आलेली आहे. तर राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या आदित्य ठाकरे यांनीही एक ट्विट करत आम्ही सविस्तर लिखित ऑर्डर पाहिल्यानंतरच यापुढचा एक्शन प्लॅन आखू असे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

आदित्या ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी नमुद केले आहे की, कांजुरमार्ग कारशेडची जागा ही मेट्रो ६, मेट्रो ४ आणि मेट्रो १४ या प्रकल्पांसाठी महत्वाची आहे. या जागेवर कारशेड डेपो उभा राहिल्याने राज्य सरकारचे ५५०० कोटी रूपये वाचणार आहेत. तसेच या प्रकल्पातून १ कोटी नागरिकांचेही पैसे वाचतील असे मत त्यांनी मांडले आहे. पण भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मात्र उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय तरी मान्य करणार का ? असा सवाल केला आहे. स्वतःच्या अहंकारातून अजून किती मुंबईकरांचे नुकसान करणार असा सवाल त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून केला आहे. मुंबई उच्च न्यायलयाने ही ठाकरे सरकारला लावलेली चपराक आहे. मिठागराच्या जागेसाठी एनओसी घेतलेली नाही, खाजगी जागेतही जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणून आदेश काढण्यात आले आहेत. जैसे थे आदेश मिळाल्याने हा आता प्रकल्प लांबणीवर पडून मुंबईकरांवर आणखी संकट आणणारा आणि तिकिट दरवाढ करणारा ठरणार आहे. आजकाल बालनाट्य बंद, पण थिएटरमध्ये बंद झालेली बालनाट्ये ही मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सुरू आहेत अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

- Advertisement -

कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेड कामाला स्थगितीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयामार्फत देण्यात आला आहे. कांजूरमार्गचे मेट्रो कारशेड डेपोच्या ठिकाणी सुरू काम तत्काळ थांबवा असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तूर्तास भूखंडाची स्थिती जैसे थे ठेवा, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आता पुढील अंतिम सुनावणी फेब्रुवारी महिन्यात होईल, असे उच्च न्यायालयाने सांगितले आहे.

पुन्हा एकदा सरकार तोंडावर आपटले आहे. अपेक्षेप्रमाणे कोर्टाने फटकारले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाला स्थगिती दिली आहे. प्रकल्पाचा वाढणारा खर्च कोण भरणार आहे असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे. चपराक देण्याचे काम कोर्टाने केले आहे. मुंबईकरांना वाहतूकीच्या समस्येवर मेट्रोसारखा पर्याय केवळ भाजपने केला यासाठीच कारशेड सगळा खटाटोप सरकारकडून करण्यात येत आहे असे दरेकर यांनी स्पष्ट केले आहे. कांजुरमार्ग कारशेडच्या बाबतीत मात्र उच्च न्यायालयाच्या बाबतीत आज दिलेल्या आदेशानुसार मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. या प्रकल्पात होणारी दिरंगाई आणि प्रकल्पातील वाढणारा खर्च याची जबाबदारी कोण घेणार ? त्यामुळेच पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

मुंबईकरांवर ५ हजार कोटींचा भूर्दंड – फडणवीस

सौनिक समितीचा अहवाल अतिशय स्पष्ट आहे. आरे येथे मेट्रो कारडेपो केल्याने पर्यावरणाची कुठलीही हानी होणार नाही. कांजुरमार्ग येथे कारडेपो केल्याने पर्यावरणाची हानी होणार आहे, हे या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केले होते. केवळ आणि केवळ सरकारच्या अहंकारासाठी हा निर्णय बदलण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला आरेची जागा दिली आहे. तेथे काम केले तर 2021 पर्यंत आपण मुंबईकरांना मेट्रो देऊ शकतो. त्यामुळे अहंकार सोडून तेथे तत्काळ काम सुरू करावे, आम्ही कोणतीही टीका करणार नाही. काही अधिकार्‍यांना हे लक्षात आले की, मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय अहंकाराने हा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांना चुकीचे ब्रिफिंग केले आहे. या निर्णयामुळे मुंबई मेट्रोच्या निर्णयात खरे तर मुख्यमंत्र्यांनीच मिठाचा खडा टाकला. कांजूरला कारशेड नेले तरी आरे येथे काम करावेच लागणार आहे. जर तेथे बांधकाम करायचेच आहे, तर मग आरे येथे कारशेड नाही, हा हट्ट का? हा आमच्यासाठी टीकेचा विषय नाही. आरेत काम सुरू करा, विजय आमचा की त्यांचा हे महत्त्वाचे नाही. मुंबईकर जिंकले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. नवीन लोकांना चांगले भविष्य आहे, त्यांनी थोडे वाचन केले पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. आपल्याच सरकारने दिलेल्या अहवालाचे वाचन केले पाहिजे. सौनिक समितीने स्पष्ट केले आहे की, 4.5 वर्षाचा विलंब आणि 5000 कोटींचा भूर्दंड हा कांजूरमार्गमुळे होणार आहे. आजच्या निर्णयाने राज्य सरकारला मोठी चपराक बसली आहे. अजूनही वेळ गेली नाही, राज्य सरकारने अहंकार सोडावा! आता सत्य स्वीकारून पुढे गेले पाहिजे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -