घरमनोरंजन'फाईटर' चित्रपटातील दीपिका- हृतिकच्या चुंबन दृश्यावर विंग कमांडर सौम्यदीप दास यांचा आक्षेप...

‘फाईटर’ चित्रपटातील दीपिका- हृतिकच्या चुंबन दृश्यावर विंग कमांडर सौम्यदीप दास यांचा आक्षेप !

Subscribe

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फाईटर' चित्रपटात दीपिका आणि हृतिक चुंबन घेताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे एअर फोर्सच्या गणवेशात हे चुंबनदृश्य चित्रित झाले आहे. या दृश्यावर इंडियन एअर फोर्सच्या एका विंग कमांडरनी आक्षेप घेतला असून, कलाकार आणि दिग्दर्शकाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

दीपिका आणि हृतिकचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘फाईटर’ हा हिंदी चित्रपट एका वेगळ्याच वादात सापडला आहे. या  चित्रपटाचं कथानक एअर फोर्सच्या फाईटर पायलेट्सवर आधारित आहे. या चित्रपटातील एका दृश्यात दीपिका आणि हृतिक यांनी फाईटर पायलेट्सचा गणवेश परिधान केला असून, ते एकमेकांना चुंबन देत आहेत. हे दृश्य पाहून एअर फोर्सचे विंग कमांडर सौम्यदीप दास यांनी आक्षेप घेत संबंधित कलाकार आणि दिग्दर्शकाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यांच्या मते एअर फोर्सचा गणवेश परिधान करून असा Kissing scene करणे म्हणजे एअर फोर्सच्या गणवेशाचा अपमान आहे. एअर फोर्सचा गणवेश म्हणजे फक्त कपड्याचा तुकडा नाही. तो गणवेश त्याग, अनुशासन आणि समर्पणाचे प्रतीक आहे. चित्रपटातील दृश्यांमध्ये कलाकार एअर फोर्सच्या जवानांच्या रूपात निश्चितच दिसू शकतात. पण त्या गणवेशातील त्यांच्या अशा हरकती चुकीच्या आहेत.

संबंधितांना दिलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये असेही म्हटले आहे की, अशा पवित्र प्रतीकांचा वापर चित्रपटातील प्रणयदृश्यांसाठी करणे चुकीचे आहे. त्यामुळे आजपर्यंत असंख्य जवानांनी आपल्या देशासाठी दिलेल्या बलिदानाचे अवमूल्यन होते. सोबतच अशा चुकीच्या व्यवहारामुळे गणवेशाचा दर्जाही सामान्य होतो. जे आपल्या सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी घेणाऱ्यांविरोधात धोकादायक उदाहरण प्रस्थापित करते.

- Advertisement -

पुढे नोटीसमध्ये असेही म्हटले आहे की, एअर फोर्सचा गणवेश घातलेल्या अधिकाऱ्यांनी सर्व लोकांमध्ये अशाप्रकारे प्रणय करणे नियमांचे उल्लंघन तर आहेच शिवाय त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि व्यावसायिक व्यवहारांना चुकीच्या पद्धतीने दर्शवतो. एअर फोर्सच्या जवानांकडून शिस्त आणि मर्यादेची अपेक्षा केली जाते. अशी दृश्ये त्यांना आपल्या गणवेश आणि कामाप्रती बेजबाबदार आणि अनादर करणारी ठरवतात. विंग कमांडर सौम्यदीप दास यांनीच चित्रपटातील हे दृश्य काढण्याची मागणी केली आहे. सोबतच या चित्रपटच्या निर्मितीशी संबंधित व्यक्तींनी आणि कलाकारांनी एअर फोर्स आणि त्याच्या जवानांची सर्वांसमक्ष माफी मागावी आणि चित्रपट निर्माणकर्त्यांनी लिखित स्वरूपात द्यावे कि, ते भविष्यात एअर फोर्सचे जवान आणि  त्यांच्या गणवेशाचा असा अपमान करणार नाहीत.

दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन अभिनित  ‘फाईटर’ चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आहेत. या चित्रपटाने जगभरातून ३५० कोटींचा गल्ला जमवला आहे. तर भारतीय बॉक्स ऑफिस वरील त्याची कमाई १७८ कोटी रुपये एवढी झाली आहे. या चित्रपटात करण सिंह ग्रोवर, अक्षय ओबेरॉय, अनिल कपूर  आदी कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -