घरमुंबईअंबरनाथमध्ये लोखंडी प्लेट अंगावर पडून कामगाराचा मृत्यू

अंबरनाथमध्ये लोखंडी प्लेट अंगावर पडून कामगाराचा मृत्यू

Subscribe

काम करताना हायड्रा क्रेनमधील लोखंडी डीस्क प्लेट क्रेनमधून सुटून थेट कामगाराच्या अंगावर पडली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

अंबरनाथ येथील आनंदनगर एमआयडीसीतील एका कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. एमआयडीसीतील एका कंपनीतून लोखंडी डिस्क प्लेट हायड्रा क्रेनच्या सहाय्याने एका ट्रकमध्ये भरण्याचे काम सुरू होते. दरम्यान, हायड्रा क्रेनमधील लोखंडी डीस्क प्लेट क्रेनमधून सुटून थेट कामगाराच्या अंगावर पडली. या लोखंडी डिस्कखाली दबून मोहम्मद इरशाद जमील अन्सारी (२२) या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या घटने प्रकरणी क्रेन चालक आणि कंपनीच्या मालका विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी घडली घटना

अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसीत सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. जे. डी. इंजिनिअरींग कंपनीतून हायड्रा क्रेन आणि कामगारांच्या सहाय्याने लोखंडी डिस्क प्लेट एका ट्रकमध्ये ठेवण्यात येत होत्या. हे काम करताना कामगारांना कंपनीकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेट आणि सेफ्टी बेल्ट देणे बंधनकारक होते. मात्र या लोखंडी डिस्क प्लेट वाहून नेतांना हायड्रा क्रेनचा ताबा सुटल्याने चैनमधील भव्य आकाराची डिस्क प्लेट खाली उभा असलेला कामगाराच्या अंगावर पडली. यामध्ये मोहम्मद इरशाद अन्सारी (२२) याचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

कंपनीच्या मालकाला अटक

या घटनेनंतर कामगार मोहम्मद अन्सारी याच्या भावाने कंपनीचा चालक आणि मालक जयंता मलिक यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत कंपनीचा मालक जयंता मलिक (४६) याला अटक केली आहे. तर हायड्रा क्रेनचा चालक हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

अंबरनाथमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -