घरमुंबईयुसूफ खान यांचा दिव्यांग प्रेरणा पुरस्काराने सन्मान!

युसूफ खान यांचा दिव्यांग प्रेरणा पुरस्काराने सन्मान!

Subscribe

दिव्यांगांच्या हक्क आणि अधिकारांसाठी गेली अनेक वर्षे युसूफ खान झगडत आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मोहम्मद युसूफ मोहम्मद फारूख खान यांचा दिव्यांग प्रेरणा पुरस्काराने गौरव करण्यात आला. ठाणे जिल्ह्यासह राज्यभरात दिव्यांगांच्या हक्क आणि अधिकारांसाठी झगडणाऱ्या बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटनेचे युसूफ खान हे प्रमुख आहेत. कल्याणचे आयुक्त बालाजी मंजुळे यांनी दिव्यांग व्यक्तींना जिल्हास्तरावर पुरस्कार प्रदान करण्यात यावे, असे निर्देश देऊन त्यासंदर्भात परिपत्रक काढले होते. दिव्यांगांच्या हक्क आणि अधिकारांसाठी गेली अनेक वर्षे युसूफ खान झगडत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने खान यांची निवड केली होती. त्यानुसार, प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी युसूफ खान यांच्या अविरत कार्याचे आणि समाजसेवेचे कौतुक करण्यात आले.


वाचा : नवाजुद्दीनआधी ‘हा’ अभिनेता साकारणार होता ‘ठाकरे’

या प्रसंगी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे शहर पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भीमनवार, ठाणे जिल्हा समाज कल्याण विभागाच्या कार्यालयीन अधिक्षक श्रीमती धिवर, शंखे,सुरेश यादव, आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मेहबूब शेख, इकबाल काजी, अब्दुल गफ्फार शेख, नुरजहां खान, अशोक कुमार गुप्ता,सुशील कुमार प्रजापति, रिमा संजय यादव, संजय दुधनाथ यादव,फरिदा स.शेख,राजेश माने, केदार गायकवाड,संजय वारूले,अर्चना राणे आदी दिव्यांग संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.


वाचा : थेट ऑक्सफर्डमध्ये ‘नारी शक्ती’ शब्दाला मानाचे स्थान!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -