घरमुंबईEknath Shinde : मुंबईत एप्रिलपासून झीरो प्रिस्किप्शन पॉलिसी, रुग्णांना मोफत उपचार -...

Eknath Shinde : मुंबईत एप्रिलपासून झीरो प्रिस्किप्शन पॉलिसी, रुग्णांना मोफत उपचार – मुख्यमंत्री

Subscribe

मुंबई : मुंबईत “आरोग्य आपल्या दारी” मोहिमेतून घरोघरी आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तसेच, झीरो प्रिस्किपशन पॉलिसी एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यासाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. (Zero prescription policy in Mumbai from April free treatment for patients CM Eknath Shinde)

मुंबई महापालिकेच्या वरळी अभियांत्रिकी संकुलाजवळ स्थित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळच्या सुमारास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करतानाच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांशी देखील संवाद साधला. यावेळी मुंबई शहर जिल्हा पालक मंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, डॉ. सुधाकर शिंदे, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, उपआयुक्त (परिमंडळ 2) प्रशांत सपकाळे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – Yashasvi Jaiswal : जैस्वालने 52 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, आता गावस्करांच्या रेकॉर्ड्सवर नजर

मुंबईकरांच्या वैद्यकीय उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यासाठीच “आरोग्य आपल्या दारी” मोहीम हाती घेतली असून या मोहिमेतून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. एप्रिलपासून झिरो प्रिस्क्रीप्शन पॉलिसी देखील सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

वरळीतील अभियांत्रिकी संकुलातील आपला दवाखान्यात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्याठिकाणी अचानक आगमन झाले. त्यावेळी उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञ, कर्मचारी वर्गाची धावपळ झाली. एकनाथ शिंदे यांनी दवाखान्यातील स्टोर रूम, औषध कक्ष, तपासणी खोली, स्वच्छ्ता गृह यांची पाहणी केली. यावेळी तेथे तपासणीसाठी आलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधत आपल्या दवाखान्याविषयी अनुभव विचारला. रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याबरोबर तेथील वैद्यकीय तज्ज्ञ आणि कर्मचारी वर्ग यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

हेही वाचा – Thackeray VS Amit Shah : तुळजाभवानी शपथ, अडीच वर्षांचा वादा झाला होता – उद्धव ठाकरे

झीरो प्रिस्किपशन पॉलिसी एप्रिलपासून

मुंबईकरांना उपचारासाठी घराजवळच सोय व्हावी या संकल्पनेतून आपला दवाखाना मुंबईत 226 ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत 42 लाख नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. याठिकाणी उपचार मोफत, कॅशलेस, पेपरलेस मिळत आहेत. त्यानंतर आता मुंबईत “आरोग्य आपल्या दारी” मोहिमेतून घरोघरी आरोग्य तपासणी केली जाणार आहे. झीरो प्रिस्किपशन पॉलिसी एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यासाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -