घरनवी मुंबईCidco : सिडकोचे निर्माणाधीन प्रकल्प वेळेत पूर्ण करा; विजय सिंघल यांचे निर्देश

Cidco : सिडकोचे निर्माणाधीन प्रकल्प वेळेत पूर्ण करा; विजय सिंघल यांचे निर्देश

Subscribe

नवी मुंबई : सिडको महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी आज (7 मार्च) सिडकोच्या विविध प्रकल्प स्थळांना भेट दिली. या भेटीत प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने व्हावी याकरिता संबंधित अधिकार्‍यांना निर्देश दिले. (Cidco Complete CIDCOs under construction projects on time Directed by Vijay Singhal)

हेही वाचा – Prakash Ambedkar : ईव्हीएम हॅक करत आंबेडकर म्हणाले, भाजपा 400 पार अशक्य!

- Advertisement -

या प्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, डॉ. कैलास शिंदे आणि दिलीप ढोले, सुरेश मेंगडे (मुख्य दक्षता अधिकारी), रविंद्र मानकर (मुख्य नियोजनकार, नवी मुंबई), गीता पिल्लई (मुख्य महाव्यवस्थापक- परिवहन व विमानतळ), शीला करुणाकरन (मुख्य अभियंता, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ), प्रभाकर फुलारी (अतिरिक्त मुख्य अभियंता), प्रिया रातांबे (जनसंपर्क अधिकारी) आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांनी सिडकोच्या निर्मित एमटीएचएल उलवे जंक्शन, युनिटी मॉल, भूमीपुत्र भवन, बामणडोंगरी गृहनिर्माण प्रकल्प, उलवे सागरी मार्ग कनेक्टिव्हिटी, जेएनपीए व सिडको अधिकारक्षेत्रातील कनेक्टिव्हिटी, उलवे व द्रोणागिरी नोड आणि लॉजिस्टिक्स पार्क या प्रकल्प स्थळांना भेट देत अधिकार्‍यांशी प्रकल्पाच्या सद्यस्थितीविषयी चर्चा केली. या प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने करण्याचे निर्देश दिले.

- Advertisement -

हेही वाचा – Rahul Gandhi : मुंबईत 17 मार्चला काँग्रेसचं शक्तिप्रदर्शन; लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार

दरम्यान, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल म्हणाले की, सिडकोचे गृहनिर्माण, प्रस्तावित युनिटी मॉल, लॉजिस्टिक्स पार्क आदी प्रकल्प हे प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्प स्थळांचा आढावा घेतला. सर्वसामान्य नागरिक, स्थानिक कारागीर, व्यावसायिक, प्रकल्पबाधित अशा विविध घटकांच्या हिताच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्त्वाचे असल्याने या प्रकल्पांची विहीत वेळेत पुर्तता करण्याचे अधिकार्‍यांना सूचित करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -