घरनवी मुंबईअनुसूचित जमातींच्या प्रलंबित प्रश्नी उपसभापतींना निवेदन

अनुसूचित जमातींच्या प्रलंबित प्रश्नी उपसभापतींना निवेदन

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधीत विषयाचे सचिव, विभाग स्तरावरील अधिकारी यांच्याकडे याविषयाबाबत पाठपुरावा करण्यात येईल. तसेच याबाबत लवकरच विधानभवनात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे डॉ. गोर्‍हे यांनी आ.रमेश पाटील यांच्या समवेत शिष्ट मंडळाला आश्वासित केले.

नवी मुंबई-
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील बांधवांच्या प्रलंबित प्रश्ना संदर्भात संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकार्‍यांसमवेत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे (Deputy Chairman Dr. Neelam Gorhe) यांच्या दालनात बैठक आयोजित करण्याबाबत कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपाचे आमदार रमेश पाटील (bjp mla Ramesh patil) यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. अनुसुचित जमातींच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारने लक्ष वेधून तातडीने त्याची सोडवणुक करण्याची मागणी आ.रमेश पाटील यांनी केली. आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली अ‍ॅड.चेतन पाटील, लक्ष्मण शिंगोरे, महादेव व्हणकाळी, गजानन पेटे, मनिषा व्हणकाळी आदींचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे यांना दिलेल्या निवेदनात अनुसूचित जमातीतील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी व इतर तत्सम जमातीच्या बांधवांना जात प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे, जात पडताळणी समित्यांमध्ये पारदर्शकता आणण्याकरिता वरिष्ठ पातळीवर एक समिती गठित करण्यात यावी, अदिवासी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ अनुसूचित क्षेत्रातील बांधवांप्रमाणेच अनुसूचित क्षेत्राबाहेरील आदिवासी बांधवांना देखील मिळावा, सर्व आदिवासी बांधवांची जातीय जनगणना करण्यात यावी, तसेच जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता रक्तसंबंधातील नातेवाईकांचे वैधता प्रमाणपत्र ग्राह्य धरून इतर कागदपत्रांची मागणी न करता यामध्ये सहजता यावी, या सर्व प्रश्नांबाबत संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकारी यांच्या सोबत उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे यांच्या दालनात संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी तसेच अनुसूचित जमाती आदेश क्र. १०८/१९७६ मधील अ. क्र. २८,२९,३० कोळी महादेव, कोळी मल्हार, या जमाती या कोळी जेनेरिक टर्मचे डिव्हिजन असल्याचे परिपत्रक निगर्गमित व्हावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -