घरनवी मुंबईऐरोली, वाशीत भाजपाकडून काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या विरोधात निषेध आंदोलन

ऐरोली, वाशीत भाजपाकडून काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या विरोधात निषेध आंदोलन

Subscribe

नवी मुंबई-; काँग्रेसचे झारखंडमधील राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या ओडिशा आणि झारखंड येथे असलेल्या बेहिशेबी मालमत्तेवर प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या छाप्यांत ३०० कोटींहून अधिक रुपयांची रोकड मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सोमवारी (ता.११) भाजपा महिला सेलच्या पदाधिकार्‍यांनी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि ऐरोली दिवागाव सर्कल येथे भाजपाच्या पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधींनी (Protest of Dheeraj Sahu by navi mumbai Bjp)  आंदोलन करुन निषेध केला. महिला व पदाधिकाऱ्यांच्यावतीने धीरज प्रसाद साहू यांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणा देत  परिसर पदाधिकाऱ्यांनी दणाणून सोडला.

- Advertisement -

ऐरोलीतील आंदोलनात भाजपचे ज्येष्ठ नेते अनंत सुतार , माजी नगरसेवक अशोक पाटील, कृष्णा पाटील, अ‍ॅड.संध्या सावंत, माजी नगरसेविका शशिकला सुतार, अपर्णा गवते व दिपा गवते यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

वाशीतील आंदोलन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महिला मोर्चाच्या चित्रा वाघ, ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार यांच्या नेतृत्वा खाली महिला सेलच्या पदाधिकारी मोठया संंख्येने सहभागी झाल्या होत्या.

- Advertisement -

आपल्या पक्षातील खासदाराकडे जवळपास साडेतीनशे कोटींचे घबाड सापडुनही सोनिया गांधी मूग गिळून गप्प का आहेत? असा सवाल भाजपा महिला मोर्चाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार आणि महिला पदाधिकार्‍यांकडून विचारण्यात आला. दोन्ही ठिकाणी उपस्थित भाजपाच्या महिला सेल आणि विविध सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -