Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरवसईत ५० खाटांचे महापालिकेचे रुग्णालय

वसईत ५० खाटांचे महापालिकेचे रुग्णालय

Subscribe

येथे आधीच उभारलेल्या प्रशासकीय इमारतीत रुग्णालय विकसित करण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाने सुरू केली आहे.

वसईः वसई-विरार शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महापालिकेने आरोग्यवर्धिनी केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारल्यानंतर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे कामही हाती घेतले आहे. या आरोग्य सुविधांमध्ये आता आणखी एका सामान्य रुग्णालयाची भर पडणार आहे. वसई पूर्वेस गोखिवरे फादरवाडी येथे ४० ते ५० खाटांचे सामान्य रुग्णालय उभारण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. येथे आधीच उभारलेल्या प्रशासकीय इमारतीत रुग्णालय विकसित करण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाने सुरू केली आहे.

वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांवर गेली असून आरोग्न समस्यादेखील वाढत आहेत. सद्यस्थितीत महापालिकेची पाच सामान्य रुग्णालये, तीन माता-बाल संगोपन केंद्रे, २१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, तीन दवाखाने, आठ आरोग्यवर्धिनी केंद्रे याद्वारे आरोग्य सेवा मोफत पुरवली जात आहे. मात्र वाढत्या गरजेनुसार, महापालिकेने या आरोग्य सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, आरोग्यवर्धिनी केंद्रे तसेच कंटेनर दवाखान्यांपाठोपाठ आता नागरिकांच्या सोयीसाठी गोखिवरे येथे सामान्य रुग्णालय विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. गोखिवरे फादरवाडी येथे महापालिकेची नव्याने बांधण्यात आलेली प्रशासकीय इमारत होती. या इमारतीचा वापर रुग्णालयासाठी करावा, अशी मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका शिल्पा सिंग यांनी केली होती. त्यानुसार, महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी या इमारतीत ४० ते ५० खाटांचे सामान्य रुग्णालय विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

या रुग्णालयात रुग्णांसाठी ओपीडी, विविध आजारांसाठी तपासणी कक्ष, आवश्यक तपासण्या करण्यासाठी मशिनरी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आरोग्य सेवेसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. रुग्णालय तयार झाल्यावर त्याचा आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास सिंग यांनी व्यक्त केला आहे.

000

- Advertisement -

जेनेरिक औषधांचे दुकानही

या रुग्णालयात ओपीडी, सोनोग्राफी, नेत्रतपासणी, एक्स-रे,लसीकरण, आयपीडी, रक्त तपासणी, ओटी, एनआयसीयू, आयसीयू आदी विभाग असणार आहेत. त्याचबरोबर फिजिशियन, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नेत्रविकारतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, कान, नाक, घसा, तज्ज्ञ आदी विशेषज्ञांची सेवा उपलब्ध केली जाणार आहे. तसेच रुग्णालयांत जेनेरिक औषधाचे दुकानही असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -