घरपालघरगोरठण गावाजवळ तरुणावर बिबट्याचा हल्ला

गोरठण गावाजवळ तरुणावर बिबट्याचा हल्ला

Subscribe

वातावरणातील बदल, जंगलातील जनावरांच्या निवार्‍यावर मानवी अतिक्रमण, अन्न पाण्याच्या शोधात जंगली प्राण्यांचा वावर हा मानव वस्तीकडे वाढू लागला आहे.

जव्हार: जव्हार शहरापासून ५ किमी अंतरावर गोरठण गावाजवळ शंभर ओहोळ नामी परिसरात रोजगार हमीचा मजूर हरेश अशोक चौधरी आपले काम करत असतानाच बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले आहे. त्याला जखमी अवस्थेत त्वरित उपजिल्हा रुग्णालयात आणले गेले आणि दवाखान्यातील प्रशासनाने नेहमी प्रमाणे गंभीर परिस्थिती लक्षात घेता नाशिक सिव्हिलला पुढील उपचारासाठी पाठवून दिले. ही घटना कळताच वनविभागाच्या वतीने या घटनेचा पंचनामा प्रक्रिया केली असल्याची माहिती उपस्थित गावकर्‍यांनी दिली आहे. वातावरणातील बदल, जंगलातील जनावरांच्या निवार्‍यावर मानवी अतिक्रमण, अन्न पाण्याच्या शोधात जंगली प्राण्यांचा वावर हा मानव वस्तीकडे वाढू लागला आहे.

गेल्या महिना भरापासून तालुक्यातील जंगल परिसरात अनेकदा बिबट्यासारखे हिंस्त्र प्राणी अन्नाच्या शोधात भटकत असताना, दिसेल त्या प्राण्यावर झडप घालून त्यांना जिवे मारणे अथवा गंभीर जखमी करणे सारखे प्रकार होत असल्याचे सांगितले जात आहे. जंगल परिसरात जंगली प्राण्यांचा वावर वाढत असल्याची बाब वनविभागाला अनेकदा कळवूनही त्यावर हव्या त्या उपाययोजना करण्यात येत नसल्याची खंत यावेळी ग्रामस्थांनी बोलताना व्यक्त केली. दिवसाढवळ्या होणारे हे हल्ले ग्रामीण जनतेला भयभीत होण्यास भाग पाडत आहेत. यावर त्वरित उपाययोजना व्हावी असाच सूर गावातून व्यक्त करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -