घरपालघरबंधार्‍यातील पाणी आणि पैसा नेमका कुठे झिरपतोय?

बंधार्‍यातील पाणी आणि पैसा नेमका कुठे झिरपतोय?

Subscribe

मात्र पाटबंधारे विभागाच्या टक्केवारीच्या ग्रहणामुळे ठेकेदार निकृष्ट दर्जाचे बंधारे बांधून लाखोंची कमाई आपल्या घशात घालतात,असे नागरिकांचे आरोप आहेत.

मोखाडा: पाणी अडवा, पाणी जिरवा असा महत्वकांक्षी उद्देश समोर ठेवून शासनाने लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून नवीन बंधारा बांधकामे हाती घेतली. सुरवातीच्या काळात लघु पाटबंधारा विभागाची ही योजना सफल होताना दिसून आली. मात्र गेल्या काही वर्षांपासून नवीन बंधारा बांधकामात ठेकेदाराकडून मोठ मोठ्या दगडी टाकून कामे उरकण्याचे सर्रास प्रकार सुरू असताना ही लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांकडून अभय दिले जात आहे.त्यामुळे या बंधार्‍यातील पाणी नेमके कुठे मुरतेय? हे शोधणे गरजेचे आहे.

तालुक्यातील चास ग्रामपंचायतीमधील जामद्याचापाडा येथील नदीवर नवीन बंधार्‍याचे बांधकाम सुरू असून ठेकेदाराकडून मात्र बंधाराच्या बांधकामात मोठ मोठ्या दगडी टाकून बंधाराचे बांधकाम उरकते घेतले जात आहे.बंधार्‍यात मोठ मोठ्या दगडी बांधकामात टाकल्याने सिमेंट मिक्स रेतीचा माल कमी बसत आहे.यामुळे या बंधार्‍यात पाणी साठून राहील का हे सांगणे कठीण आहेच. त्याहीपेक्षा पावसाळ्यात नदीला पुराचे पाणी जास्त येत असल्याने पहिल्याच पावसाळ्यात बंधारा वाहून जाण्याची भिती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पावसाचे प्रमाण आवश्यक ते पेक्षा जेथे कमी असते तेथील जमिनीवरील पिकांस अथवा शेतीस कृत्रिमरीत्या पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून नदी – नाले च्या पाण्याच्या प्रवाहात बंधारे बांधले जातात व या बंधार्‍याच्या पाण्यातून शेतीच्या पिकांस ( सिंचन ) जिवदान दिले जाते.मात्र पाटबंधारे विभागाच्या टक्केवारीच्या ग्रहणामुळे ठेकेदार निकृष्ट दर्जाचे बंधारे बांधून लाखोंची कमाई आपल्या घशात घालतात,असे नागरिकांचे आरोप आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -