भाईंदर :- काशीमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काशीगावाच्या भागात संजय गांधी नॅशनल पार्क परिसराला लागून असणार्या भागात एका आठ वर्षीय पीडित मुलीवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी नराधम आरोपी विरोधात बलात्कारा सह पोस्कोचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काशीमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास जवळ असलेल्या झाडी झुडुपात आठ वर्षाची अल्पवयीन पीडित ही बाथरूम साठी गेली असता तिथेच आरोपी आनंद राजभर (वय २४) याने कोणी नसल्याचा फायदा घेऊन पीडितेवर बलात्कार केला.
तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपीवर बलात्कारासह पोस्कोचा गुन्हा काशीमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीला अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अधिक तपास काशीमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सोनावणे हे करत आहेत.