घररायगडRaigad Collector : रायगड जिल्हाधिकारीपदी किशन जावळे

Raigad Collector : रायगड जिल्हाधिकारीपदी किशन जावळे

Subscribe

अलिबाग : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे डॉ. योगेश म्हसे यांची बदली झाली आहे. डॉ. म्हसे यांच्या जागी कोकण आयुक्त कार्यालयात अप्पर आयुक्त, कोकण विभाग पदी कार्यरत असणारे किशन जावळे यांची वर्णी लागली आहे. (Kishan Jawle as Raigad Collector)

हेही वाचा – Maharashtra Politics : अजित पवार गटाला धक्का; सुनील तटकरेंचे मोठे बंधू शरद पवार गटात

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. राज्यातील आघाडी सरकारकडून अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. आपल्या मर्जीतील अधिकारी आणण्याचा खटाटोप राज्यातील सत्ताधारी पक्षातील आमदार व मंत्री करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रायगडचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा – Jarange VS Baraskar : बारसकरांच्या आरोपांवर जरांगे म्हणतात, ‘सरकारने माझ्याविरुद्ध सापळा रचला’

- Advertisement -

अप्पर आयुक्त कोकण विभाग किशन जावळे यांची रायगड जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी काढलेल्या प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट केले आहे. रायगडचे मावळते जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांची रायगड जिल्हाधिकारी पदावरून बदली झाली असली तरी त्यांना अद्याप कोणत्याही ठिकाणी नियुक्ती केलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -