घरपालघर.....आणि पालघर पोलिसांमुळे मोठी दुर्घटना होता होता टळली

…..आणि पालघर पोलिसांमुळे मोठी दुर्घटना होता होता टळली

Subscribe

नवली फाटका जवळील एस. बी. आय. बँकेच्या एटीएमच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत अंधाराच्या ठिकाणी काही इसम दोन मोटार टेम्पोसह संशयीतरीत्या काहीतरी हालचाली करीत असल्याचे निदर्शनास आले.

पालघर:  पालघर येथे शहरात दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या १२ आरोपींना पालघर पोलिसांच्या रात्र गस्ती पथकाने अटक केली आहे. यावेळी आरोपी कडून पोलिसांनी दोन चारचाकी मोटर टेम्पो, लोखंडी कटर, लोखंडी धारदार कोयता, नॉयलॉन दोर, लोखंडी कटावणी, दोन हॅन्डलचे खिळे काढण्याचे लोखंडी कटर, वायर कापण्याचे लोखंडी कटर तसेच मिरची पुड असे साहीत्य जप्त केली आहेत. या टोळीतील मुख्य सूत्रधार फरार असून दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्र गस्त घालणार्‍या पथकातील पोलीस हवालदार रवींद्र गोरे, हवालदार आर. एम. पवार व हवालदार लहांगे हे रात्रीच्या गस्त करत असताना १८ जुलै रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास पालघर पुर्व येथील नवली फाटका जवळील एस. बी. आय. बँकेच्या एटीएमच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत अंधाराच्या ठिकाणी काही इसम दोन मोटार टेम्पोसह संशयीतरीत्या काहीतरी हालचाली करीत असल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी लगेच पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पगडे यांना याबाबत सूचना दिली. उपनिरीक्षक पगडे यांनी सूचना मिळताच वेगळे पथके तयार करून घटनास्थळी हजर झाले, पोलिसांना पाहता हे संशयित पळून जायची तयारीत असताना त्यांचा पाठलाग करून ऐकून १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांकडून कसून चौकशी केली असता शहरात मोठा दरोडा टाकण्याची कबुली या संशयितांकडून देण्यात आली. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन चारचाकी मोटर टेम्पो, लोखंडी कटर, लोखंडी धारदार कोयता, नॉयलॉन दोर, लोखंडी कटावणी, दोन हॅन्डलचे खिळे काढण्याचे लोखंडी कटर, वायर कापण्याचे लोखंडी कटर तसेच मिरची पुड असे साहीत्य आदळून आले. या आरोपी विरुध्द पालघर पोलीस ठाणेत येथे भा.द.वि.सं. कलम ३९९, ४०२, सह आर्म ऍक्ट क. ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पालघर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे करीत आहेत. या कारवाईत महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मंजुषा शिरसाट, उपनिरीक्षक बालाजी मुंढे, उपनिरीक्षक संकेत पगडे, उपनिरीक्षक दौलत आतकारी, सुभाष खंडागळे, रविंद्र गोरे, पवार, आव्हाड, सुरूम, मुसळे, खराड, लहांगे, डुबल, कांबळे सामील होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -