घरपालघर३ महिन्यांत ८ हजार वाहन चालकांवर कारवाई

३ महिन्यांत ८ हजार वाहन चालकांवर कारवाई

Subscribe

प्रशासनाने व वाहतूक शाखेने एक दिलाने वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्याचे ठरवले तर हा प्रश्न कायमचा निकाली निघू शकतो,असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

पालघर: पालघर जिल्हा वाहतूक शाखेने नवीन वर्षातील प्रथम तीन महिन्यात एक जानेवारी ते २७ मार्च या कालावधीमध्ये ८ हजार १०० बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली आहे. या वाहनचालकांना ३१ लाख ५५ हजार १०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. जिल्हा होऊन दहा वर्षाचा कालावधी लोटला मात्र मुख्य शहरातील रस्ते आजही अरुंद अवस्थेत आहेत. त्याच रस्त्यावर वाहन चालकांकडून दुचाकी सुद्धा रस्त्यावर ठेवण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीस मोठ्या प्रमाणात हातभार लागत आहे. पालघर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असून वाहन तळासाठी पालघर नगरपरिषदेने प्रयत्न करणे अपेक्षित असताना नगरपरिषदेस कशाचेही पडलेले नाही,अशी नागरिकांची तक्रार आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यास त्यांच्या मदतीची गरज आहे, मात्र ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. प्रशासनाने व वाहतूक शाखेने एक दिलाने वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्याचे ठरवले तर हा प्रश्न कायमचा निकाली निघू शकतो,असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

अनेक ठिकाणी अरुंद रस्ते परवानगी नसताना मन मर्जीने टाकण्यात आलेली गतिरोधक स्टेशन व महत्त्वाच्या परिसरात वाहतूक कोंडी अशा विविध समस्यांचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे जशी जागा मिळेल त्या पद्धतीने वाहन पुढे काढण्यात असलेला वाहन चालकांचा उतावळेपणा, बेशिस्त पद्धतीने वाहन चालवणे यामुळे वाहतूक कोंडीस हातभार लागत आहे. तसेच आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी युवकांकडून प्रमुख रस्त्यावर स्टंटबाजी करणे कट मारणे अशा बेशिस्तपणाला शिस्त लागावी याकरिता जिल्हा वाहतूक शाखेकडून ही कारवाई गेल्या तीन महिन्यात करण्यात आल्याचे जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सुरेश साळुंखे यांनी सांगितले. वाहतूक शाखेकडून करण्यात येणार्‍या कारवाईत ड्रंक अँड ड्राईव्ह, विना हेल्मेट, अवैध प्रवासी वाहतूक, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे, सीट बेल्ट न लावणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, विनापरवाना वाहन चालविणे अशा विविध प्रकारची कारवाई दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांवर वाहतूक शाखेकडून करण्यात आली आहे. मुंबई -अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर देशातील प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या दुर्दैवी कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर शासनाने बेदरकारपणे वाहन चालवणार्‍यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -