घरपालघरयुरिया खताच्या बेकायदा साठ्यावर कारवाई

युरिया खताच्या बेकायदा साठ्यावर कारवाई

Subscribe

त्या ठिकाणी शेतीच्या वापरासाठी असलेल्या युरिया खताचा तीन टन बेकायदा साठा आणि दोन वाहने पोलिसांना आढळून आली.

बोईसर : बोईसर- चिल्हार मार्गावरील एका गोदामावर छापा टाकून शेतीच्या वापरासाठी असलेल्या युरिया खताचा संशयित साठा बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी गोदामाच्या मालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. (ता.३१ )डिसेंबरच्या रात्री बोईसर चिल्हार मार्गावर पोलिसांची गस्त सुरू असताना गुंदले येथील वाघोबा खिंडीजवळ आतल्या रस्त्यावर काही तरुण पोलिसांना बघून पळून गेले. पोलिसांनी संशयावरून या ठिकाणी असलेल्या एका बंद गोदामाची तपासणी केली असता त्या ठिकाणी शेतीच्या वापरासाठी असलेल्या युरिया खताचा तीन टन बेकायदा साठा आणि दोन वाहने पोलिसांना आढळून आली.

तारापूर एमआयडीसी मधील काही कारखानदारांना युरिया पुरवठा करणार्‍या युरिया दलालाचा कारनामा उघड करण्यास बोईसर पोलिसांना यश आले आहे. अनेक वर्षांपासून शेतकर्‍यांच्या नावाने कमी किमतीत युरिया खरेदी करून १ हजार ते २ हजारपर्यंत या युरियाचा काळाबाजार एमआयडीसीतील काही युरिया माफिया करत आहेत.तारापूर- एमआयडीसीच्या जवळच वाघोबा खिंड गुंदले गावाच्या बाजूला अनाधिकृतपणे मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांसाठी आलेला युरिया बोईसर पोलिसांनी पकडला आहे .या ठिकाणी कृषी विभागाचे अधिकारी सुद्धा येऊन या घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. अनेक वर्षापासून हा काळाबाजार सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट शेतकर्‍यांना युरिया खत मिळावे, युरियाचा काळाबाजार होऊ नये म्हणून निम कॉटेड युरिया निर्माण केला, व या बॅगेला सुद्धा एक वेगळा पद्धतीचा रंग देण्यात आला. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात युरियाचा काळाबाजार होताना दिसत आहे.

- Advertisement -

युरियाचा वापर औद्योगिक कारणासाठी

तारापूर एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात युरियाचा वापर हा औद्योगिक कारणासाठी केला जात असताना या ठिकाणी चक्क शेतकर्‍यांसाठी दिला जाणारा युरीया, सापडल्याने मोठे खळबळ उडाली आहे .मात्र हा तपास लावण्यामध्ये बोईसर पोलिसांना यश आले आहे . याची माहिती पालघर कृषी विभागाला दिल्यानंतर कृषी विभागाचे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक प्रकाश राठोड आणि लक्ष्मण लामकाने यांनी गोदामातील साठ्याचे नमुने घेत साठा ताब्यात घेतला आहे. गोदामातील युरियाचा बेकायदा साठा आणि गोदामाचे मालक यांचा बोईसर पोलिसांमार्फत शोध घेतला जात असून अधिक चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान चौधरी हे करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -