घरठाणेTransporters Strike : बाईक, कारमध्ये पेट्रोल-डिझेल फुल्ल करुन घ्या! पुढचे 2-3 दिवस...

Transporters Strike : बाईक, कारमध्ये पेट्रोल-डिझेल फुल्ल करुन घ्या! पुढचे 2-3 दिवस टंचाईची शक्यता

Subscribe

Petrol Diesel Tanker Drivers Strike मुंबई – आपल्या बाईक, कारमध्ये पेट्रोल-डिझेल फुल्ल करुन घ्या, अन्यथा पुढचे दोन-तीन दिवस इंधन टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. अशा व्हायरल मेसेजमुळे वसई, वाशिम, यवतमाळ, छ. संभाजीनगर, जालना येथे पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

राज्यात टँकर चालकांनी तीन दिवस संप पुकारला आहे. नवी मुंबईत आज बंदला हिंसक वळण लागले. हा संप आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहन चालकांनी पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण होण्याच्या शक्यतेने पेट्रोल पंपावर रांगा लावल्या आहेत. दरम्यान, वाहनचालक संघटनांनी आपला संप मागे घ्यावा यासाठी टँकर, ट्रक चालक, आरटीओ अधिकारी आणि प्रशासनामध्ये बैठक पार पडली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून वाहनचालक संघटना आपल्या संपावर ठाम आहेत. याचपार्श्वभूमीवर उद्या पेट्रोल न मिळण्याच्या शंकेने पेट्रोल पंपावर आज लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

- Advertisement -

केंद्र सरकारकडून नवीन मोटार वाहन कायदा आणला जात आहे. या कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी विरोध केला आहे. नवी मोटर वाहन कायद्याविरोधात ट्रकचालक आजपासून (सोमवार) संपावर गेले आहेत. या संपात महाराष्ट्रातील टँकरचालक देखील सहभागी आहेत. 1 जानेवारीपासून सुरु झालेल्या या तीन दिवस संपामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सकाळपासून 10 ते 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यामुळे महामार्गावरुन जाणाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले.

बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल वाहन चालक संपात सहभागी

नवीन मोटार वाहन कायद्याला देशभरात विरोध होत आहे. या कायद्याच्या विरोधात टँकरचालकांनी संप पुकारला आहे. नवीन कायदा रद्द करा, अशी मागणी करत बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल-डिझेल पुरवठादार टँकर चालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. आज (1 जानेवारी) घोडबंदर येथील फाऊन्टन हॅाटेलजवळ ट्रक चालकांनी चक्का जाम आंदोलन केले. त्यामुळे तेथे वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत होते.

- Advertisement -

नवीन कायद्यात अपघाताला ट्रक चालकच जबाबदार, सात लाखांचा दंड 

नवीन मोटार वाहन कायद्यात (Bhartiya Nyaya Sanhita) अपघातास ट्रक चालकाला जबाबदार धरले जाणार आहे. या कायद्यानुसार दहा वर्षांच्या शिक्षेची (10 year jail) तरतूद केली आहे. तसेच सात लाख रुपये दंड ( 7 lakh penalty) करण्यात येणार आहे. यामुळे नवीन मोटार वाहन कायद्याला देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांनी विरोध केला. हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी पेट्रोलियम कंपन्यांच्या टँकर चालकांनी (transporters strike) संपाचे हत्यार उपसले आहे. देशभरात विविध ठिकाणी सोमवारी आंदोलन करण्यात आले. मनमाड डेपोतून एकही टँकर बाहेर पडले नाही. यामुळे मनमाड डेपोतून इंधन वाहतूक ठप्प झाली आहे. टँकर चालकांचा हा संप मिटला नाही तर मराठवाड्यासह राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल-डिझेल टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Truck Driver Strike : ट्रक चालकांच्या आंदोलनाला नवी मुंबईत हिंसक वळण; पोलिसांकडून गुन्हा दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -