घरपालघरठाणे जिल्हा परिषदेकडे असलेले अतिरिक्त शिक्षक महापालिकेला द्या

ठाणे जिल्हा परिषदेकडे असलेले अतिरिक्त शिक्षक महापालिकेला द्या

Subscribe

या शाळेत चांगल्या सुविधा व शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.

भाईंदर :- मीरा -भाईंदर महापालिका शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांची भरती झालेली नाही. त्यामुळे मंजूर पदापेक्षा शिक्षकांची संख्या कमी आहे. ही कमी असलेली शिक्षकांची संख्या भरून काढण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद शाळेत शून्य विद्यार्थी पतसंख्या ठरलेले अतिरिक्त शिक्षक महापालिकेला तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याची मागणी आयुक्त दिलीप ढोले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. शहरात मीरा -भाईंदर महापालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू माध्यमांच्या ३६ शाळा आहेत. या शाळेत चांगल्या सुविधा व शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.

या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी २०२१-२२ मधील संचिका मान्यतेनुसार २३७ शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. परंतु पालिकेच्या आस्थापनेवर १५१ शिक्षकच कार्यरत आहेत. पूर्वी महापालिकेच्या शाळा सातवीपर्यंत होत्या. २०२१-२२ पासून पालिकेने ८ वी ते १० वी पर्यंतचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरु केले आहेत. तसेच यावर्षी पासून काही शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग देखील सुरू केले आहेत. या शाळांमध्ये जवळपास साडे आठ हजार विद्यार्थी पटसंख्या असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षकांची कमतरता भासत आहे. त्यामुळे महापालिकेने ठेका पद्धतीवर ५६ शिक्षक नियुक्त केले आहेत.

- Advertisement -

 

तरीही आणखी काही शिक्षकांची कमतरता भासत आहे. त्यामुळे आयुक्तांनी जिल्हापरिषद शाळांमधील शून्य विद्यार्थी पटसंख्येमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची मीरा-भाईंदर महापालिका शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याची मागणी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. तसा प्रस्ताव सुद्धा जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आल्याचे शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांनी सांगितले. हे शिक्षक महापालिका शाळेला प्राप्त झाल्यास त्यांचे पूर्ण वेतन शासन देणार आहे. त्यामुळे यासाठी महापालिकेचा कोणताही खर्च होणार नाही. तसेच महापालिका शाळेत असलेल्या शिक्षकांची कमतरता देखील भरून निघणार आहे असे पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -