घरपालघरबिल्डरला गंडा घालणारा भोंदूबाबा अटकेत

बिल्डरला गंडा घालणारा भोंदूबाबा अटकेत

Subscribe

एका भोंदू बाबाने व्यवसायात चांगले दिवस येण्यासाठी पूजा अर्चा करण्याच्या नावाखाली विरारमधील एका बिल्डराला ४५ लाखांचा गंडा घातल्याचे तसेच बिल्डरच्या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार बिल्डरच्या निधनानंतर उजेडात आली आहे.

एका भोंदू बाबाने व्यवसायात चांगले दिवस येण्यासाठी पूजा अर्चा करण्याच्या नावाखाली विरारमधील एका बिल्डराला ४५ लाखांचा गंडा घातल्याचे तसेच बिल्डरच्या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार बिल्डरच्या निधनानंतर उजेडात आली आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी त्या भोंदूबाबाला अटक केली आहे. मोहम्मद समीर अब्दुल शफूर उर्फ समीर कादरी (वय ४१, रा. गोपचरपाडा, विरार पूर्व) असे भोंदूबाबाचे नाव आहे. विरारमधील बिल्डर चंद्रदीप स्वामी यांना त्याने तब्बल ४५ लाखांचा गंडा घातल्याचे त्यांच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी कुटुंबियांच्या हाती लागलेल्या चिठ्ठीवरून उजेडात आले आहे.

भोंदूबाबा कादरी चंद्रदीप स्वामी याच्याकडे मागील सहा ते सात वर्षांपासून ठेकेदार म्हणून काम करत होता. त्यामुळे दोघांची चांगली ओळख होती. याचा फायदा उचलत हिमालयात राहणार्‍या एका पाचशे वर्षे वयाचा बाबा पूजा अर्चा करणार असून त्यामुळे व्यवसायात चांगले दिवस येतील, अशी बतावणी करून भोंदूबाबा समीर कादरीने स्वामी यांच्याकडून तब्बल ४५ लाख रुपये उकळले होते.

- Advertisement -

भोंदूबाबाने चंद्रदीप स्वामींच्या निवासस्थानी नियमितपणे पूजा केली होती. पण, त्यांच्या बांधकाम प्रकल्पांचे नुकसान झाले. सप्टेंबरमध्ये चंद्रदीप स्वामी यांचे पुजाविधी दरम्यान करण्यात आलेल्या धुराच्या त्रासामुळे आजार येऊन निधन झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबियांना घरात एक वही सापडली. ज्यामध्ये तांत्रिकाने फसवणूक केल्याचा उल्लेख चंद्रदीप स्वामी यांनी केला होता. तशी तक्रार स्वामी यांच्या मुलीने केली आहे. तसेच बॉक्सिंग क्षेत्रातून दुर करण्यासाठी पुजा करण्याच्या नावाखाली तळघरात नेऊन आपला विधयभंग केल्याचीही तक्रार स्वामी यांच्या मुलीने केली आहे. या तक्रारीवरून विरार पोलिसांनी जादू टोणा प्रतिबंध कायदा तसेच विनयभंगाच्या गुन्हा दाखल करून भोंदूबाबा समीर कादरीला अटक केली आहे.

हेही वाचा –

Maharashtra School Reopen : राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -