घरपालघरअतिक्रमण, भरावाला मंडळ अधिकारीच जबाबदार

अतिक्रमण, भरावाला मंडळ अधिकारीच जबाबदार

Subscribe

पेल्हार येथील कादरभाई चाळ प्रकरणात मंडळ अधिकार्‍यांनी कोणतीही नोटीस न बजावता दुसर्‍याच जागेवर तोडक कारवाई केल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

वसईः वसई तालुक्याच्या पूर्व पट्टीत सरकारी जागांवर अतिक्रमण करून बेकायदा बांधकामे होत आहेत. त्याचबरोबर बेकायदा खदानी, माती भरावही केले जात असून त्याला संबंधित मंडळ अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते एलायस डिसिल्वा यांनी तहसिलदारांकडे केली आहे. गेल्या काही वर्षांपासून पूर्वपट्टीत सरकारी जागांवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामांचा वेग वाढला आहे. अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण दिले जात असल्याची डिसिल्वा यांची तक्रार असून त्याचा एक नमुना त्यांनी उजेडात आणला आहे. पेल्हार येथील कादरभाई चाळ प्रकरणात मंडळ अधिकार्‍यांनी कोणतीही नोटीस न बजावता दुसर्‍याच जागेवर तोडक कारवाई केल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

वसई तालुक्याच्या पूर्वपट्टीत अनेक बेकायदा दगड खाणी सुरु आहेत. काही ठिकाणी महिलांच्या नावावर दगडखाणी सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याठिकाणी हाताने दगड फोडण्याचे परवानगी असताना थेट मशिनद्वारे दगड फोडले जात असल्याचे आढळून आले आहे. यातील काही दगडखाण मालक राजकीय पक्षांशी संबंधित असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची त्यांची तक्रार आहे. बेकायदा माती भराव हा पूर्वपट्टीतील गंभीर प्रश्न बनला आहे. बेकायदा माती भराव प्रचंड प्रमाणात झाल्याने गेल्या दोन-तीन वर्षात पाणी साचून मुंबई-अहमदाबाद महामार्ग जलमय होऊन वाहतूक ठप्प होत असल्याचे प्रकार होत आहेत. माती भराव करताना तिवरांच्या झाडांचीही मोठ्या प्रमाणावर कत्तल होत असतानाही महसूल खात्याकडून कारवाई केली जात नसल्याचीही तक्रार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -