घरपालघरकॅसेटवाल्याचा मारेकरी ३६ वर्षांनी जेरबंद

कॅसेटवाल्याचा मारेकरी ३६ वर्षांनी जेरबंद

Subscribe

मात्र, यातील मुख्य आरोपी क्लेमेन बोलो उर्फ मुन्ना फरार झाला होता. परदेशात लपून असलेला क्लेमेन गुंगारा देत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

वसईः १९८८ मध्ये वसईत भररस्त्यात एका कॅसेटवाल्याची हत्या करून फरार झालेला मुख्य आरोपी तब्बल३ ३६ वर्षांनी माणिकपूर पोलिसांच्या हाती लागला. क्लेमेन बोलो उर्फ मुन्ना असे त्याचे नाव आहे. १९८८ साली माणिकपूर शहरात कॅसेटचा व्यवसाय करणारा सलीम कमाल उर्फ सलीम कॅसेटवाला दत्तात्रय शॉपिंग सेंटरसमोर संध्याकाळी सातच्या सुमारास आपल्या मुलासोबत पाणीपुरी खाण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याच्या मागावर असलेल्या सात जणांच्या टोळीने भरस्त्यात त्याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. मात्र, यातील मुख्य आरोपी क्लेमेन बोलो उर्फ मुन्ना फरार झाला होता. परदेशात लपून असलेला क्लेमेन गुंगारा देत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

त्याचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. हत्याप्रकरण थंड झाले होते. माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केला होता. फरार आरोपी क्लेमेन लोबो हा परदेशातून वसईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला पुढील तपासासाठी वसई पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे, अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -