घरपालघरचांबळ्याचा देशी पांढरा कांदा बाजारात दाखल

चांबळ्याचा देशी पांढरा कांदा बाजारात दाखल

Subscribe

यावर्षी तालुक्यात बर्‍यापैकी पांढर्‍या कांद्याची लागवड करण्यात आली आहे.

वाडा : ज्याची दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस आतुरतेने वाट पाहिली जाते असा औषधी गुणधर्म असलेला वाडा तालुक्यातील चांबळे येथील प्रसिद्ध पांढरा कांदा बाजारात दाखल झाला आहे. शेतातून कांदा काढून सूकवून माळा बनवून विक्रीस बाजारात उपलब्ध झाला आहे. यावर्षी कांद्याचे पीकही उत्तम आल्याने शेतकरी आनंदित आहे.भात पीक कापणी झाल्यानंतर पांढरा कांदा लागवडीला सुरुवात होते. वाडा तालुक्यात चांबळा, डाकिवली,असनस,चिखला,गातेस केळठण या काही मोजक्याच गावात पांढरा कांदा लागवड केली जाते. पांढर्‍या कांद्याला पोषक वातावरण आणि पारंपारिक लागवड यामुळे आजही पांढरा कांदा आपले औषधी गुणधर्म टिकून आहे. बाजारात या कांद्याला मोठी मागणी आहे आणि ती वाढत आहे. तालुक्यात प्रामुख्याने चांबळे,डाकिवली, केळठण या गावांमध्ये पांढर्‍या कांद्याचे पीक घेतले जात असे. त्यानंतर तालुक्यात इतरही गावांमध्ये पांढर्‍या कांद्याची लागवड शेतकरी करू लागले. यावर्षी तालुक्यात बर्‍यापैकी पांढर्‍या कांद्याची लागवड करण्यात आली आहे.

यंदा पडलेली थंडी ही पांढर्‍या कांद्याला पोषक ठरली आहे. त्यामुळे यंदा कांद्याचा आकार थोड्या प्रमाणात वाढला आहे. यंदा पांढर्‍या कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. शेतात कांदा तयार झाला असून, शेतकरी काढणी करीत आहे. कांदा काढल्यानंतर उन्हात दहा ते पंधरा दिवस सुकवला जात आहे. त्यानंतर घरी आणून मजुरांमार्फत त्यांच्या माळा बांधल्या जात आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया

यावर्षी पांढरे कांद्याचे उत्पादन चांगले आले आहे. थंडीही कांद्याला पोषक ठरले आहे. सध्या कांदा काढणी सुरू असून, तो सुकून मला तयार केल्या जात आहेत. एका माळेला ७० ते ८० दर मिळत आहे.
– उल्हास पाटील, शेतकरी चांबळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -