घरमहाराष्ट्रपुणेVijay Shivtare : अजित पवारांच्या विरोधात जाणे पडणार भारी, शिवसेना शिवतारेंना धाडणार...

Vijay Shivtare : अजित पवारांच्या विरोधात जाणे पडणार भारी, शिवसेना शिवतारेंना धाडणार शिस्तभंगाची नोटीस

Subscribe

शिवसेनेकडून विजय शिवतारे यांना लवकरच पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी नोटीस पाठवली जाईल. यानंतरही विजय शिवतारे यांनी पक्षादेश मानला नाही तर त्यांना शिवसेनेकडून बाहेरचा रस्ताही दाखवण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे माजी आमदार, नेते विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीत शिवसेनेसोबत असले तरी शिवतारेंनी मात्र त्यांच्याविरोधात बोलणे कायम ठेवले आहे. अजित पवारांविरोधात न बोलता युतीधर्म पाळावा, असे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विजय शिवतारे यांना देण्यात आले आहेत. मात्र, तरी देखील शिवतारेंनी अजित पवारांविरोधात घेतलेली आक्रमक भूमिका मागे घेण्यास नकार दिल्याचेच पाहायला मिळत आहे. ज्यामुळे आता शिवतारेंना शिवसेनेकडून शिस्तभंगाची नोटीस पाठवण्यात येणार आहे. (Shiv Sena will send a disciplinary notice to Vijay Shivtare for speaking against Ajit Pawar)

हेही वाचा… Maha Politics : अजित पवारांसमोरच दिलीप मोहिते पाटलांचा अढळरावांना इशारा, म्हणाले…

- Advertisement -

महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार आहे. परंतु, बारामतीतून सुनेत्रा पवारांना उमेदवारी न देत्या त्या लोकसभेची मागणी विजय शिवतारे यांच्याकडून करण्यात आली. पण याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने आता अखेरीस शिवतारे हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम आहेत, पण त्यांनी घेतलेला हा निर्णय पक्षाच्या आणि महायुतीच्या विरोधातील असल्याने निर्वाणीचा उपाय म्हणून शिंदे गटाकडून विजय शिवतारे यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. आज दिवसभर या शिस्तभंगाच्या नोटिसीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे रात्रीपर्यंत कधीही त्यांना ही नोटीस पाठवण्यात येऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेकडून विजय शिवतारे यांना लवकरच पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी नोटीस पाठवली जाईल. यानंतरही विजय शिवतारे यांनी पक्षादेश मानला नाही तर त्यांना शिवसेनेकडून बाहेरचा रस्ताही दाखवण्यात येईल, असे सांगितले जात आहे. विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: विजय शिवतारे यांची मनधरणी केली होती. त्यानंतरही शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते.

- Advertisement -

विजय शिवतारे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महायुती अस्तित्त्वात आली तेव्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर एकमेकांशी जुळवून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, आता शिवतारे यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो. ही बाब लक्षात घेऊन एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी विजय शिवतारे यांच्यावर अखेर कारवाईचा बडगा उगारण्याचे ठरवल्याचे सांगितले जात आहे.

विजय शिवतारे यांना शिवसेनेकडून त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या संभाव्य शिस्तभंगाच्या कारवाईबाबत विचारण्यात आले. तेव्हा शिवतारे यांनी म्हटले की, मला पक्षाकडून अद्याप कोणतीही नोटीस आलेली नाही. मी उद्या खडकवासला मतदारसंघाचा दौरा करणार आहे. मी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहे. ज्यामुळे आता शिवसेनेने त्यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर विजय शिवतारे पुढे काय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -