घरपालघरजिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडून नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी

जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडून नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी

Subscribe

नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले असून त्याअनुषंगाने मोखाडा तहसीलदार मयूर खेंगले यांनी आंबा, काजू फळपिकांचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागासह तलाठी व ग्रामसेवक यांना दिले आहेत.

मोखाडा : राज्यात अवकाळी झालेल्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणावर फळपिक, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.मोखाडा तालुक्यातही सलग 2 दिवस झालेल्या वादळी पावसामुळे फळबाग लागवडी खालील क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या सर्व नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहाणी करण्यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी भेट देऊन पहाणी केली असून, कोणीही शासकीय मदतीपासून वंचित रहाणार नाही असा शेतकर्‍यांना विश्वास दिला आहे. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले असून त्याअनुषंगाने मोखाडा तहसीलदार मयूर खेंगले यांनी आंबा, काजू फळपिकांचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागासह तलाठी व ग्रामसेवक यांना दिले आहेत.

मोखाडा तालुक्यात काजू ..315.50 हेक्टर.आंबा 265.90 हेक्टर क्षेत्र हे फळबाग लागवडी खाली आहे.यातील बहूतांश शेतकर्‍यांना अवकाळीचा फटका बसलेला आहे.पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यानी सकाळी 7.00 वाजल्यापासून मोखाडा तालुक्यात नुकसानग्रस्त क्षेत्रास प्रत्यक्ष भेटी देऊन वस्तुस्थितीची पाहाणी केली आहे.यात खोडाळा,डोलारा, कोशिमशेत (सडकवाडी) सातुर्ली या गावातील नुकसानग्रस्त भागाला प्रातिनिधिक स्वरूपात भेट देऊन संबंधित शेतकरी यांना धीर देऊन त्यांच्याशी चर्चा केली असून यंत्रणांना सविस्तर पंचनामे करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत .तसेच कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे सांगितले आहे. तहसीलदार मयूर खेंगले, तालुका कृषी अधिकारी सुनिल पारधी, मंडळ कृषी अधिकारी आकाश सोळुंके, प्रेमदास राठोड, कृषी पर्यवेक्षक विकास बोरसे, प्रशांत कुंडले कृषी, भरत पवार, कृषी सहाय्यक विजय जाधव, दिपक कोल्हे,महेश शितोळे,जयवंत बाळशी,बापु लांबाडे, खोडाळा मंडळ महसूल निरीक्षक हरेश जनाठे, तलाठी सर्वश्री विकास ठाकरे,अविनाश वड, देविदास चौरे, शरद बिन्नर उपस्थित होते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -