घरपालघरबोईसर दरोड्यातील तीन आरोपी जेरबंद

बोईसर दरोड्यातील तीन आरोपी जेरबंद

Subscribe

त्यांना दोराने खुर्चीला बांधून कार्यालयातील रोख रक्कम तसेच महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि चहा घेऊन आलेल्या माणसाच्या हातातील अंगठी असा लाखो रुपयांचा एवज लुटून चोरांनी पोबारा केला होता.

बोईसर : बोईसर शहरातील एका खासगी कार्यालयावर शस्त्रांचा धाक दाखवून टाकलेल्या दरोड्यातील पाच पैकी तीन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसाना यश आले असून अजून दोन आरोपी फरार आहेत. बोईसरच्या ओसवाल एम्पायरच्या रिषभ अपार्टमेंटमधील राजश्री इंटरप्राईजेस या खाजगी कार्यालयावर ३ मार्च रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. कार्यालयात काम करणारी एक महिला आणि तरुण यांना चाकूचा भाग दाखवत तसेच त्यांना दोराने खुर्चीला बांधून कार्यालयातील रोख रक्कम तसेच महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि चहा घेऊन आलेल्या माणसाच्या हातातील अंगठी असा लाखो रुपयांचा एवज लुटून चोरांनी पोबारा केला होता.

बोईसरमध्ये दिवसाढवळ्या पडलेल्या या सशस्त्र दरोड्याने मोठी खळबळ माजली होती.दरोड्याची माहिती मिळताच पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट,उप अधीक्षक (गृह) शैलेश काळे यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देऊन बोईसरचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांना तपासाबाबत सूचना केली होती.त्यानुसार बोईसर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी बोईसरपासून दादरपर्यंत सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक कौशल्य वापरून तपास करीत दादर येथून तीन दरोडेखोरांना ८ मार्च रोजी जेरबंद करण्यात यश मिळवले.यातील दोन आरोपी अजून फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -