घरपालघरअखेर दहिसर ते मिरा-भाईंदर लिंक रोडचा विस्तार होणार

अखेर दहिसर ते मिरा-भाईंदर लिंक रोडचा विस्तार होणार

Subscribe

बोरिवली ते गोराई दरम्यान खाडीवर बांधण्यात येणाऱ्या लिंक रोडमध्ये दहिसर ते मिरा-भाईंदर या लिंक रोडच्या विस्ताराचा प्रस्ताव समाविष्ट करण्यात येणार आहे.

बोरिवली ते गोराई दरम्यान खाडीवर बांधण्यात येणाऱ्या लिंक रोडमध्ये दहिसर ते मिरा-भाईंदर या लिंक रोडच्या विस्ताराचा प्रस्ताव समाविष्ट करण्यात येणार आहे. पाच किलोमीटरसाठी तब्बल पंधराशे कोटी रुपये खर्च होणार आहेत. मुंबईच्या वेशीवर असून वाहतुकीच्या दृष्टीने मिरा-भाईंदरचा परिसर मुंबई शहराशी पश्चिम रेल्वे आणि पश्चिम एक्सप्रेस हायवेने जोडले गेलेला आहे. मुंबईशी जोडणारे रस्ता मार्ग एकच असल्याने वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. दहिसर टोल नाक्यावर नेहमीच होणारी वाहतुक कोंडी चिंतेचा विषय बनत चालली आहे. त्यावर मात करण्यासाठी दहिसर ते मिरा-भाईंदर लिंक रोड तयार करावा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती.

आमदार सरनाईक यांच्या मागणीनुसार मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी या दहिसर ते मिरा-भाईंदर या लिंक रोडच्या विषयावर बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला मुंबई महापालिका, मिरा भाईंदर महापालिका, एमएमआरडीए, एमएसआरडीसीचे अधिकारी उपस्थित होते. याबैठकीत दहिसर ते मिरा भाईंदर लिंक रस्ता तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. दहिसर ते मिरा भाईंदर हा लिंक रस्ता साधारण ५ किलोमीटर लांबीचा असेल. विकास आराखड्यात ६० मीटर रुंदीचा हा रस्ता आहे. रस्त्याच्या कामासाठी साधारण १५०० कोटी रूपये खर्च येणार आहे. मुंबई महापालिका, रस्ते विकास महामंडळ, एमएमआरडीए यांच्यापैकी रस्त्याचा विकास कोण करणार याचा निर्णय मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे लवकरच घेतील, अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.

- Advertisement -

लिंक रस्ता काळाची गरज आहे. एकूण ५ किमीच्या लिंक रस्त्यात दीड किमी रस्ता मुंबई महापालिकेच्या हद्दीतून येईल. तर ३.५ किमी रस्ता हा मिरा भाईंदर महापालिका हद्दीत असणार आहे. दहिसर टोलनाका येथे दररोज होणारी वाहतुक कोंडी, मिरा भाईंदर शहरात वाढणारी वाहन संख्या पाहता मुंबई व मिरा-भाईंदरच्या नागरिकांसाठी हा लिंक रस्ता उपयुक्त ठरणार आहे. रस्ता तयार झाल्यानंतर मिरा भाईंदरच्या नागरिकांची वेळ, इंधन आणि पैशांचीही बचत होणार आहे, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.

हेही वाचा –

मी जे बोलत होतो माफी मागणार नाही, ते बरोबर, त्यांनी जरूर हक्कभंग आणावा, भास्कर जाधव आक्रमक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -