घरपालघरअपना घर संकुलात चिमुकल्याचा मृत्यू

अपना घर संकुलात चिमुकल्याचा मृत्यू

Subscribe

याठिकाणी इमारतीच्या कामासाठी मोठमोठे अँगल ठेवण्यात आले आहे. त्यापरिसरात शुभम सुधांशू दास (५) आणि जयंत बच्चन दास (५) ही दोन मुले खेळत होती.

भाईंदरः काशिमीरा परिसरात सुरु असलेल्या अपना घर फेस-३ या गृहसंकुलाच्या आवारात लोखंडी अँगल डोक्यात पडून एका पाच वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. याच परिसरात काही दिवसांपूर्वी कामगाराचा अपघाती मृत्यूही झाला होता. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित सेव्हन इलेव्हन कंस्ट्रक्शन कंपनीचा अपना घर फेस-३ गृहसंकुलाचे काम काशिमीरा परिसरात सुरु आहे. याठिकाणी इमारतीच्या कामासाठी मोठमोठे अँगल ठेवण्यात आले आहे. त्यापरिसरात शुभम सुधांशू दास (५) आणि जयंत बच्चन दास (५) ही दोन मुले खेळत होती. त्यावेळी अचानक लोखंडी अँगल डोक्यावर पडून शुभम आणि जयंत जखमी झाले.

गंभीर जखमी झालेल्या दोन्ही मुलांना मिरारोड येथील भक्ती वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांनाही मुंबईच्या कोकीळाबेन रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असतानाच  शुभमचा मृत्यू झाला आहे. तर जयंत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईच्या कोकीळाबेन रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृत्ती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. शुभम हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे दास कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपना घर गृहसंकुलात २० ते २१ माळ्यांच्या इमारतींचे बांधकाम सुरु आहे. याच परिसरात काही दिवसांपूर्वी एका कामगाराचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. मीरा भाईंदर शहरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीरून पडून कामगारांचे मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. पण, कामगार आयुक्तांकडून त्याची गंभीरपणे दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -