घरदेश-विदेशचीन भूकंपाने हादरले, २० जणांचा मृत्यू; १० किलोमीटरपर्यंत जाणवले धक्के

चीन भूकंपाने हादरले, २० जणांचा मृत्यू; १० किलोमीटरपर्यंत जाणवले धक्के

Subscribe

वुहान – चीनच्या दक्षिणी पश्चिम सिचुआन प्रांतातील लुडिंह काऊंटमध्ये ६.६ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे तब्बल २१ जणांचा मृत्यू झाला आहे. दुपारी बाराच्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. १० किलोमीटरपर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले. जूनमध्येही याआधी भूकंप झाला होता. या भूकंपात तेव्हा चार जणांचा मृत्यू झाला.

चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, भूकंप स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी झाला. या भूकंपाचा केंद्र २९.५९ उत्तर अक्षांश आणि १०२.०८ डिग्री पूर्व जमीनीपासून १६ किलोमीटर खोल आहे.
लुडिंग काऊंटीपासून ३९ किलोमीटरपासून लांब हा भूकंप झाला. भूकंप ज्याठिकाणी झाला तेथून पाच किलोमीटर अंतरावर अनेक गावे आहेत. भंकपाचे धक्के सिचुआन प्रांताची राजधानी चेंगदूमध्येही जाणवले, जे भूकंपाच्या केंद्रापासून जवळपास २२६ किलोमीटर अंतरावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -