घरपालघरवैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

वैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

Subscribe

तर संबंधित अधिकार्‍यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मी करीत आहे असे निकम म्हणाले.

मनोर: ग्रामीण रुग्णालयात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हा परिषद सदस्य नीता पाटील, विनया पाटील, प्रतिभा गुरोडा यांनी रुग्णालयाची पाहणी केली.तसेच दोषी असणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांवर निश्चितच कारवाई करण्यात येईल, असा इशारा निकम यांनी दिला आहे. ज्या दिवशी सदर महिलेला दाखल केले त्या दिवशी डॉक्टर आले नाहीत. त्यामुळे हा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी जाणीवपूर्वक केलेला हलगर्जीपणा असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. यापुढे जर असा प्रकार पुन्हा घडला तर संबंधित अधिकार्‍यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मी करीत आहे असे निकम म्हणाले.

तसेच हा प्रकार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कानावर घालून कारवाईची मागणी करणार असल्याचे यावेळी अध्यक्ष निकम यांनी सांगितले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व लिपिक हे उद्धट व मनमानी करणारे असून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून सदर घटनेची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात करा असे आदेश अध्यक्षांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले. यावेळी रुग्णालयाची पाहणी केली असता अध्यक्ष निकम व उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी ग्रामीण रुग्णालयाबाबत नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातील सर्वात जास्त रुग्णसंख्या असलेले ग्रामीण रुग्णालय मनोर हे असून रुग्णालयाची स्वच्छता, बंद पडलेल्या मशीनरी, बंद असलेले स्वच्छता गृह, बसण्यासाठी कार्यालय रिक्त पदे इत्यादी समस्या तातडीने सोडवा अशा सूचना यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी दिले. तसेच रुग्णालयाच्या इमारतीची अतिशय दुरवस्था झाली असून लगतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गोडाऊनमध्ये रुग्णालय हलवून तातडीने जुनी इमारत दुरुस्त करण्यात यावी अथवा नवीन बांधण्यात यावी अशी सूचनाही यावेळी अध्यक्षांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -