घरमुंबईबेस्टची एसी इलेक्ट्रिक दुमजली बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल

बेस्टची एसी इलेक्ट्रिक दुमजली बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल

Subscribe

या बसमध्ये, आधुनिक पद्धतीची आसन व्यवस्था आहे. खालील भागात ३५ आसने तर वरील भागात ३० आसने अशी एकूण ६५ आसनांची व्यवस्था आहे. संपूर्ण एसी बस असल्याने या बसला मुंबईकरांची चांगली पसंती मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबईः बेस्ट उपक्रमाची एसी इलेक्ट्रिक दुमजली बस बेस्टच्या परिवहन विभागाच्या बस ताफ्यात सोमवारी दाखल झाली. त्यामुळे आता मुंबईकरांचा दुमजली बसमधील प्रवास गारेगार होणार आहे. विशेष म्हणजे या बसला दोन दरवाजे आहेत. जुन्या डबल डेकर बसला एकच दरवाजा होता. त्यामुळे मंबईकरांची गैरसोय होणार नाही.

या बसमध्ये, आधुनिक पद्धतीची आसन व्यवस्था आहे. खालील भागात ३५ आसने तर वरील भागात ३० आसने अशी एकूण ६५ आसनांची व्यवस्था या बसमध्ये आहे. ही संपूर्ण एसी बस असल्याने या बसला मुंबईकरांची चांगली पसंती मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. बेस्टने जुन्या दुमजली बसगाड्या भंगारात मोडीत काढत त्याऐवजी आता नवीन एसी इलेक्ट्रिक दुमजली गाड्या सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ही बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. या बसची किमत ६० कोटी आहे.

- Advertisement -

भारतातील व बेस्ट उपक्रमातील पहिली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेली एसी इलेक्ट्रिक दुमजली बस उपक्रमात दाखल झाल्याने बस ताफ्याची शान वाढली आहे. सोमवारी कुलाबा बेस्ट भवन या ठिकाणी सदर बसचे उद्घाटन बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक तथा प्रशासक लोकेश चंद्र यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपक्रमाचे वरिष्ठ अधिकारी/कर्मचारी तसेच विविध प्रसारमाध्यमांतील वार्ताहर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही डबल डेक बस प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमातर्फे देण्यात आली आहे.

आत्तापर्यंत बेस्टच्या ताफ्यात फक्त डिझेलवर चालणाऱ्या डबलडेकर बस होत्या, पण मुंबईकरांना प्रवासाचा सुखद अनुभव देण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात ९०० डबलडेकर बस घेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. आता इलेक्ट्रीक बसच्या पर्यायामुळे इंधनाची सुद्धा बचत होणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीच्या दृष्टीने प्रवासी क्षमतावाढ सुद्धा शक्य होणार आहे. डबलडेकर इलेक्ट्रिक एसी बस गाड्यांची सुविधा देशात प्रथमच मुंबईत उपलब्ध होणार आहे. तर, बेस्टच्या नवीन प्रीमियम एसी बसगाड्यांसाठी प्रवाशांना बेस्टच्या चलो अॅपचा वापर करून ऑनलाइन तिकीट बुकिंग व आरक्षण करता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -