घरपालघररेल्वे गाडयांमधील प्रवाशांना सुरक्षा देण्याची मागणी

रेल्वे गाडयांमधील प्रवाशांना सुरक्षा देण्याची मागणी

Subscribe

तसेच अनधिकृत प्रवास केल्यास अशा लोकांवर योग्य ती कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

पालघर: राजस्थानमधील अजमेर येथील हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या दरगाहचे उर्स महोत्सव १८ जानेवारी रोजी आहे. तसेच अयोध्या येथील श्री राममंदिराचा भव्य उद्घाटन समारंभ २२ जानेवारी रोजी होणार आहे. देशभरातून मुस्लीम समाज रेल्वे गाड्यांद्वारे अजमेर येथे जाणार आहे.या सर्व पार्श्वभूमीवर त्या सर्वांना योग्य सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी पालघर येथील सुन्नी मुस्लिम सेवा संस्था यांनी केली आहे. १५ जानेवारी ते ३० जानेवारी दरम्यान पश्चिम रेल्वेच्या गाड्यांमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत विशेष गंभीरतेने लक्ष घालत रेल्वे डब्यांमध्ये जी.आर.पी. आणि आर.पी.एफ. जवानांची अधिक तैनाती करून कोणताही गैरप्रकार होवू नये, याबाबतीत विशेष लक्ष द्वावे अशी मागणी करण्यात आली आहे. उपरान्त रेल्वे डब्यांमध्ये फक्त आरक्षित प्रवाशांनाच प्रवास करण्यास बंधनकारक करावे, वेटींग लिस्टवर असणार्‍या आणि विना टिकीट प्रवाशांना रेल्वेमध्ये प्रवास करण्याची परवानगी नाकारावी. तसेच अनधिकृत प्रवास केल्यास अशा लोकांवर योग्य ती कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -