घरपालघरमाजी महापौर रुपेश जाधव यांना ईडीची नोटीस?

माजी महापौर रुपेश जाधव यांना ईडीची नोटीस?

Subscribe

त्याची प्रत सोशल मिडीयावर झाली आहे. ७८० कोटी रुपयांच्या 'मनी लाँड्रिंग' प्रकरणात चौकशीसाठी १५ दिवसांत नवी दिल्ली येथील 'ईडी'च्या कार्यालयात हजर राहावे, असे या नोटिशीत म्हटले आहे.

वसई : वसई-विरार महापालिकेच्या माजी महापौरांसह चार जणांना ईडीने ७८० कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी चौकशीची नोटीस बजावल्याची एक प्रत सध्या वसई विरारमध्ये सोशल मिडीयातून वायरल होत आहे. ही नोटीस बनावट असून आपणाला अथवा आपल्या कंपनीला तशी नोटीस आली नसल्याचा दावा करत जाधव यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.माजी महापौर जाधव यांची ‘गणेश व्हेंचर’ नावाची भागिदारीत बांधकाम कंपनी आहे. या कंपनीचे संचालक रुपेश जाधव, मनोज चतुर्वेदी, गंगाराम मुकुंद आणि अनिश गीध या चौघांना अंमलबजावणी संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नोटीस बजावली असून, त्याची प्रत सोशल मिडीयावर झाली आहे. ७८० कोटी रुपयांच्या ‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणात चौकशीसाठी १५ दिवसांत नवी दिल्ली येथील ‘ईडी’च्या कार्यालयात हजर राहावे, असे या नोटिशीत म्हटले आहे.

ही नोटीस बनावट असून आम्हाला कुठलीच नोटीस आलेली नाही. ज्या तक्रारदाराशी आमचा वाद आहे त्याने ही बनावट नोटीस तयार केली असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. नोटीस यायला हवी, पण ती इतरांना कशी गेली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. याप्रकरणी नाहक बदनामी केल्याबद्दल तसेच अंमलबजावणी संचालनालयाची बनावट कागदपत्रे तयार केल्याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -