घरपालघरवातावरणात निवडणुका दिसायला लागल्या

वातावरणात निवडणुका दिसायला लागल्या

Subscribe

पाच वर्षातुन नविन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, कार्यकर्त्यांचे वाढदिवस अशा विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणे सुरू केल्याने कार्यक्रमात गर्दी वाढून भेटीगाठींना उधाण आले आहे.

जव्हार: जव्हार नगर परिषदेची नगरसेवक कार्यकारणी बरखास्त होऊन आता दहा महिने उलटले असून प्रशासक म्हणून मुख्याधिकारी मानिनी कांबळे यांच्याकडे पदभार आहे. नगरपरिषदेसह लोकसभा २०२४ च्या निवडणुकीचे वारे आताच वाहू लागले असल्याचे दिसून येत आहे. सत्तेच्या चढाओढीत युतीचे चित्र सध्यातरी स्पष्ट झाले नसले तरी, अनेक इच्छुकांनी भेटीगाठी, सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणे, पाच वर्षातुन नविन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, कार्यकर्त्यांचे वाढदिवस अशा विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणे सुरू केल्याने कार्यक्रमात गर्दी वाढून भेटीगाठींना उधाण आले आहे.

शहरासह मतदारसंघात आगामी निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचा प्रत्यय मतदारांना येत असून, त्याचा अनुभवही जव्हार शहरातील विविध उत्सवात विविध पक्षांच्या आजी, माजी पदाधिकार्‍यांनी जाहिरात करीत मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने आला आहे. नेते मंडळी तर पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचे सोडून हळद, लग्न समारंभ अशा ठिकाणी जाऊन गाडी गाडी खेळण्यात व्यस्त असल्याची टीका मतदार राजा करीत आहे.आगामी निवडणुकीत मलाच उमेदवारी मिळेल अशा आशेत नवे चेहरे समोर येत आहेत. राज्यात युतीचे अजूनही चित्र स्पष्ट नसताना काहींनी तर आतापासूनच आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांची काळजी घेणे सुरू केले आहे.

- Advertisement -

नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात चौका-चौकांत विविध पक्षातील नेते व पदाधिकारी यांच्या स्वागत कमाणीमुळे सध्या राजकीय वातावरण तापत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आगामी होऊ घातलेल्या सण, उत्सवात या कार्यकर्त्यांकडून उत्सवामध्येही अशा बाशिंग बांधलेल्या उमेदवारांकडून कार्यकर्ते चांगलेच हात पिवळे करून घेतील, असे चित्र सध्यातरी पाहण्यास मिळणार आहे. काहींनी पक्ष बाजूला ठेवत आपल्या संघटनांच्या नावावर लाखोंची उधळण करत वेगवेगळे कार्यक्रम घेतले आहेत. त्याचे परिणाम म्हणजे निश्चितच पक्षातील कार्यकर्ते हे आपल्यापासून दूर तर जात नाहीत ना? हाही त्या इच्छुक झालेल्या उमेदवारांसमोर प्रश्न पडला आहे. नव्याने स्थापन झालेली महाआघाडी याचा काय फरक पडणार हेही पाहणे गरजेचे आहे. काही आपला मार्गही बदलण्याच्या तयारीत दिसत असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे. कारण, सध्या पक्षा- पक्षात सुरू असलेल्या इनकमिंग-आऊट गोईंग वरून लक्षात येत आहेत. अनेक सामाजिक संघटनाही आपल्याच पक्षात याव्यात यासाठी अनेक पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न होताना दिसत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -