घरक्राइमMahadev Online Betting App: रणबीर कपूर पाठोपाठ बॉलीवूडमधील आणखी तिघांना ED चा...

Mahadev Online Betting App: रणबीर कपूर पाठोपाठ बॉलीवूडमधील आणखी तिघांना ED चा समन्स

Subscribe

या तिघांनाही चौकशीसाठी कधी बोलावण्यात आले याची माहिती अद्याप समोर आली नसून, मात्र, आता ईडीने बॉलीवूड भोवती आपला फास आवळण्यास सुरूवात केली आहे.

मुंबई : महादेव ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारखाली आता अनेक टीव्ही आणि बॉलिवूड सेलिब्रिटी आले आहेत. या प्रकरणी आता ईडीने कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि टीव्ही अभिनेत्री हिना खान यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. याआधी 4 ऑक्टोबर रोजी ईडीने अभिनेता रणबीर कपूरला समन्स पाठवले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. (Mahadev Online Betting App ED summons 3 more Bollywood actors after Ranbir Kapoor)

या तिघांनाही चौकशीसाठी कधी बोलावण्यात आले याची माहिती अद्याप समोर आली नसून, मात्र, आता ईडीने बॉलीवूड भोवती आपला फास आवळण्यास सुरूवात केली आहे. रणबीर कपूरला 6 ऑक्टोबर रोजी रायपूर येथील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र, अभिनेता रणबीर कपूरने हजेरी लावण्यासाठी एका आठवड्याची मुदतवाढ मागितल्याचीही माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

रणबीरवर ईडीला यामुळे आहे संशय

रणबीर कपूरवर सौरभ चंद्राकरच्या बेटिंग Appची जाहिरात केल्याचा आरोप आहे. यासाठी हवालाद्वारे रणबीरला रोख रक्कम देण्यात आली होती, असे ईडीचे म्हणणे आहे. या संदर्भात अभिनेत्याची चौकशी करावी लागणार आहे.

- Advertisement -

ईडीने आतापर्यंत केली 417 कोटींची मालमत्ता जप्त

महादेव ऑनलाइन बेटिंग प्रकरणात ईडीने यापूर्वी 15 सप्टेंबर रोजी रायपूर, भोपाळ, मुंबई आणि कोलकत्ता याठिकाणी 39 ठिकाणी छापे टाकले होते. ईडीच्या पथकाने सट्टेबाजांनी लपून ठेवलेली 417 कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जप्त केली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा : या माणसाने देशाचं वाटोळं केलं; आव्हाडांच्या ट्वीटनंतर अण्णा हजारे उचलणार कठोर पाऊल

या मटका किंगनी विणले जाळे

महादेव बेटिंग Appचे दोन जण प्रमुख आहेत. सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल महादेव. दोघांनाही सट्टेबाजीचे व्यसन होते. या नात्याने दोघांची मैत्री झाली. त्यानंतर अचानक दोघेही दुबईला पळून गेले. तेथे शेख आणि पाकिस्तानी साथीदारासोबत त्याने महादेव ऑनलाइन बेटिंग App सुरू केले. त्यानंतर काही वेळातच दोघेही सट्टेबाजीच्या दुनियेचे मटका किंग बनले.

हेही वाचा : World Cup 2023 : वचपा काढला ! किवींचा इंग्लंडवर 9 विकेटने दणदणीत विजय

अंडरवर्ल्डचा पैसा गुंतवल्याचा संशय

महादेव बेटिंग Appचे मालक याला गेमिंग App म्हणतात. मात्र या Appच्या माध्यमातून बेटिंगचा व्यवसाय केला जात असल्याचा संशय तपास यंत्रणेला आला. यामध्ये अनेक बड्या लोकांनी आपले पैसे गुंतवले असल्याचे सांगण्यात येत आहे. या Appमध्ये अंडरवर्ल्डचा पैसा गुंतला असल्याचाही संशय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -