घरपालघरसाडे चौदा लाख रुपये मिळवून दिले परत

साडे चौदा लाख रुपये मिळवून दिले परत

Subscribe

या माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदारांची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात वळती झाल्याचे दिसून आले.

भाईंदर :- काशीमीरा परिसरात राहणार्‍या इसमाला शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्यास सांगून त्याची १६ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. त्यापैकी १४ लाख ५० हजार रुपये तक्रारदार यांना काशिमीरा पोलीस परत मिळवून दिले आहेत. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा परिसरात राहणार्‍या पंकज श्रीवास्तव यांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली होती. या फसवणुकीच्या अनुषंगाने काशिमीरा पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारी बाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांच्या झालेल्या व्यवहाराबाबत माहिती पोलिसांनी प्राप्त केली. या माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदारांची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात वळती झाल्याचे दिसून आले.

त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधीत बँकेसोबत पत्रव्यवहार करुन संशयीत खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली. त्यानंतर न्यायालयाकडून तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्यासाठी काशिमीरा पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार यांनी वेळोवेळी पाठ पुरावा केल्याने तक्रारदार यांची फसवणूक झालेल्या रक्कमेपैकी १४ लाख ५० हजार रुपये रक्कम त्यांच्या खात्यावर परत आली आहे. ही कामगिरी प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ -१, विजयकुमार मराठे, सहा. पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, पोहवा दिनेश आहेर यांनी पार पाडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -