घरपालघरगावाचा देव गावदेव ! परंपरा जपत शिसणे यात्रा संपन्न

गावाचा देव गावदेव ! परंपरा जपत शिसणे यात्रा संपन्न

Subscribe

यावेळी या गावदेवात मोठ्या प्रमाणात दुकाने देखील थाटली गेली होती. यात्रे निमित्त लांबून - लांबून हौशी नागरिक गावदेव यात्रा पाहण्यासाठी हजेरी लावतात. यात्रेसाठी ग्रामस्थांचे चोख नियोजन असल्याने कार्यक्रमाला कोणतेही गालबोट न लागता दरवर्षी हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो.

डहाणू : पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असून आदिवासी समाजाच्या चाली-रिती, रूढी परंपरा अजूनही आदिवासी समाजाने सुरूच ठेवल्या आहेत. मातीशी आपली पाळेमुळे घट्ट रोवत आदिवासी समाजाने संस्कृती जपण्याच्या प्रयत्न करत केला आहे. असाच एक ग्रामीण भागात ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक गावात गावदेव साजरा करण्यात येतो.डहाणू तालुक्यातील शिसणे येथे गावदेव पूजेनिमित्त एक दिवसीय यात्रा उत्सव सोमवार ७ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. शिसणे गावातील गावदेव यात्रोत्सव प्रसिद्ध असल्याने डहाणू व तलासरी तालुक्यातून हजारोंच्या संख्येने नागरिक या गावदेव यात्रेत दरवर्षी हजेरी लावत असतात. या ठिकाणी गावदेवाची पुजा झाल्यानंतर तारपा व डीजेच्या तालावर नाच-गाणे करून आनंद व्यक्त करतात. यावेळी या गावदेवात मोठ्या प्रमाणात दुकाने देखील थाटली गेली होती. यात्रे निमित्त लांबून – लांबून हौशी नागरिक गावदेव यात्रा पाहण्यासाठी हजेरी लावतात. यात्रेसाठी ग्रामस्थांचे चोख नियोजन असल्याने कार्यक्रमाला कोणतेही गालबोट न लागता दरवर्षी हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो.

काय आहे गावदेव?
काय आहे प्रथा ?

- Advertisement -

गावात सामाजिक कार्य,लग्न कार्य, भात झोडणी आदी कामे करण्याच्या अगोदर गावाच्या वेशीवर किंवा गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी सार्वजनिक गाव देव मंदिर असते. हा गावदेव वाघोबा म्हणून ओळखला जातो. तो दगड किंवा लाकडापासून घडवला जातो. गावातील सण उत्सव साजरा करण्याअगोदर गावदेवाची पूजा केली जाते. त्यानंतर गावात सर्व शुभ कामे केली जातात. ही प्रथा खूप जुनी असल्याचे जाणकारांचे मत आहे.

कोट –
शिसणे गावदेवासाठी दरवर्षी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून हजारो संख्येने नागरिक येत असतात. ग्रामस्थांचे चोख नियोजन असते. परिसरात शिसणे गावेदव प्रसिद्ध असल्याने हौशी नागरिक येत असतात.
– रामजी बोधले , ग्रामस्थ , सामाजिक कार्यकर्ते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -