Live Update : उद्योगपती गौतम अदानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला 

corona update krishn janmashtami 2022 rain update aditya thackeray ashish shelar dahi handi

उद्योगपती गौतम अदानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला


अनिल परब यांना साई रिसॉर्ट प्रकरणी अंतरिम जामीन मंजूर


महाराष्ट्रात राजकारणाची पातळी घसरू नको- देवेंद्र फडणवीस

राजकारणात आचारसंहिता पाळायला हवी


सत्तारांवर कारवाई व्हायला हवी – आदित्य ठाकरे

मंत्रिमंडळात एकही महिला नाही


छत्रपती शिवाजी महाराजांवरून राज्यात वाद नको – आदित्य ठाकरे


मध्य प्रदेशमधील रस्त्यांच्या दयनीय परिस्थितीमुळे नितीन गडकरी नाराज; खराब रस्त्यांमुळे जनतेला त्रास होत असल्याने नितीन गडकरींनी मागितली माफी


वरळी येथे खड्ड्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू


बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्येष्ठ सून जयश्री कालेलकर ठाकरे यांचे निधन; जयदेव ठाकरेंच्या पहिल्या पत्नी
यांचे आज सकाळी 7 वाजता निधन झाले.


अब्दुल सत्तारांविरोधात बारामती आणि साताऱ्यासह ठिकठिकाणी आंदोलने


राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाचं राज्यपालांना निवेदन; अब्दुल सत्तारांना बडतर्फ करण्याची मागणी


आदित्य ठाकरे औरंगाबाद येथील गुरुद्वारामध्ये दाखल


आदित्य ठाकरे आज संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार


राष्ट्रीय सेवा दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; भारत जोडो यात्रेदरम्यानची घटना


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लालकृष्ण अडवाणींच्या निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही लालकृष्ण आडवाणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या


अनिल परबांविरोधात मध्यरात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने ते पुन्हा अडचणीत आले आहेत.


मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाट चौपदरीकरणाच्या कामासाठी पुन्हा बंद, ईगल्स इंफ्रा कंपनीने दिली माहिती. पावसाळ्यात दरड खाली आल्याने या घाटातील वाहतूक महिनाभर बंद करण्यात आली होती. मात्र आता या घाटातील चौपदरीकरणाचा भराव आणि रुंदीकरणाचे काम जलद गतीने व्हावे यासाठी घाटातील वाहतूक काही दिवस बंद ठेवावी लागणार आहे.पर्यायी वाहतूक लोटे-चिरणी-कळबस्ते मार्गाने वळवण्यात येईल अशी माहिती ईगल्स इंफ्रा कंपनीकडून देण्यात आली आहे.


लालकृष्ण आडवाणी यांचा आज 94 वा वाढदिवस


हर हर महादेव चित्रपटाबाबत बोलू नका – राज ठाकरेंच्या मनसे प्रवक्त्यांना सूचना


दहशतवादी कारवायांसाठी दाऊदची रसद; एनआयएच्या आरोपपात्रातून खुलासा

मागील चार वर्षात हवालामार्फत 12 ते 13 कोटींचे फंडिंग


हर हर महादेव चित्रपटाचा ठाण्यातील शो बंद केल्याने राष्ट्रवादीच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल


भारत जोडो यात्रेला थोड्याच वेळात सुरुवात होणार

राहुल गांधी यांच्या उपस्थितीत भारत जोडो यात्रेचा आजचा महाराष्ट्रतील पहिला दिवस


गुजरातमध्ये वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक; यावेळी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी ट्रेनमध्ये होते


पुणे – नाशिक महामार्गावर राष्ट्रवादीने टायर पेटवले; अब्दुल सत्तारांविरोधात राज्यभर निदर्शने

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचेराज्यभर पाडसद उमटले आहते. पुणे-नाशिक महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसने टायर पेटवले. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव बायपास जवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्षांसह दहा कार्यकर्ते ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.