घरपालघरदेव तारी त्याला कोण मारी

देव तारी त्याला कोण मारी

Subscribe

या रस्त्यावरून गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास वेस्टर्न हॉटेलशेजारी सिमेंट मिक्सर ही गाडी चालकाने गटारीच्या झाकणावर घातल्याने ते झाकण तुटून गटारात पडल्याने आणि चालकाचा टँकरवरील ताबा सुटला.

भाईंदर :- सध्याच्या जलद जगात अपघात ही नित्याचीच बाब झालेली आहे.पण या जलद जगात भीषण अपघातात देखील काहीजण केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचतात. अशी घटना काशिमिरा येथे घडली आहे. गुरुवारी(13) सकाळी १० च्या सुमारास एक दुचाकी चालक रस्त्याने जात होता.त्याच दिशेने सिमेंट मिक्सरची गाडी जात होती. ती गाडी गटाराच्या झाकणावर जात असताना गाडी पलटी झाली आणि दुचाकीचालक गाडीखाली पडला. परंतु, नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला. काशिमिरा येथील सगणाय देवी मंदिराच्या बाजूने हडकेश मिरारोड येथे जाण्यासाठी मोठा रस्ता आहे. या रस्त्यावरून गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास वेस्टर्न हॉटेलशेजारी सिमेंट मिक्सर ही गाडी चालकाने गटारीच्या झाकणावर घातल्याने ते झाकण तुटून गटारात पडल्याने आणि चालकाचा टँकरवरील ताबा सुटला.

त्यानंतर टँकर मोटारासायकल चालक विनोद कुमार विश्वकर्मा याच्या अंगावर पडला. त्यावेळी मोठा आवाज झाल्याने ऐकून काशिमिरा वाहतूक शाखेचे एपीआय कतुरे, एपीआय कड, पोलीस हवलदार गीते, घुगे व बत्ते यांनी त्या दिशेने धाव घेतली. मोटारसायकल चालक टँकर खाली गुंतलेला असल्याने त्यास सुखरूप बाजूला करण्यासाठी तात्काळ कोणताही विलंब न लावता खाजगी हायड्रा मागवून त्या सिमेंट मिक्सर वाहनाखाली अडकलेल्या इसमाला सुखरूपपणे बाजूला करण्यात आले. त्याला तात्काळ ऑर्बिट हॉस्पिटल येथे दवा उपचारासाठी रवाना केले. त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला त्याच्या पायाला जखम झाली आहे. मिक्सर वाहन चालकाविरोधात काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -