घरपालघरगुंदावे गावच्या स्मशानभूमी जोड रस्त्याच्या कामाला सुरुवात

गुंदावे गावच्या स्मशानभूमी जोड रस्त्याच्या कामाला सुरुवात

Subscribe

स्मशानभूमी लगतच्या लघुपाटा वरून स्मशानभूमीकडे जाणार रस्ता होता.मुख्य कालव्यातून गुंदावे गावाच्या दिशेने जाणार्‍या लघुपाटाकडे जाणार्‍या पाण्याचा प्रवाह लघु पाटातील सिमेंट पाईप गाळाने भरून गेल्याने बंद झाला होता.

मनोर: वरई -पारगाव रस्त्यावरील आदिवासी बहुल गुंदावे गावाच्या स्मशानभूमीचा जोड रस्ता खोदल्याने मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. याबाबची बातमी प्रसिध्द होताच पाटबंधारे विभागाने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.रस्ता तयार करण्यासाठी मुख्य कालव्याच्या प्रवाहात सिमेंट पाइप टाकण्यात आले आहेत.स्मशानभूमी जोड रस्त्याचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. वांद्री -धरणाच्या डाव्या कालव्याला लागून गुंदावे गावची स्मशानभूमी आहे.स्मशानभूमी लगतच्या लघुपाटा वरून स्मशानभूमीकडे जाणार रस्ता होता.मुख्य कालव्यातून गुंदावे गावाच्या दिशेने जाणार्‍या लघुपाटाकडे जाणार्‍या पाण्याचा प्रवाह लघु पाटातील सिमेंट पाईप गाळाने भरून गेल्याने बंद झाला होता.

सिमेंट पाइपमधून पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने पाटबंधारे विभागाच्या कर्मचार्‍यांनी गाळाने भरलेल्या पाइपमधील गाळ काढण्या ऐवजी लघुपाट खोदून लघुपाटाला बाह्य वळण देऊन मुख्य कालव्यातील पाणी लघु पाटा लगतच्या नाल्यातून पाणी वळवून पुढे पुन्हा लघुपाटात सोडून शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली होती.वांद्री धरणाच्या डाव्या कालव्यावरील गुंदावे गावचा लघुपाट खोदल्याने स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बंद झाल्याने स्मशानभूमीकडे जाण्यासाठी ग्रामस्थांना मुख्य कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहातून वाट काढावी लागत होती.जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या सिंचन हंगामाच्या सुरुवातीला लघु पाट खोदण्यात आला होता. गेल्या चार महिन्यात गावात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता.दोन्ही वेळेस मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी मोठी कसरत करावी लागली होती. मंगळवारपासून पाटबंधारे विभागाकडून स्मशानभूमीच्या जोड रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या गैरसोयी बाबतची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर पाटबंधारे विभागाने दखल घेत रस्त्याचे काम सुरू केले आहे.
सातवी, ग्रामस्थ,गुंदावे.

- Advertisement -

पाटबंधारे विभागाने गुंदावे गावाच्या स्मशानभूमी जोड रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्याने ग्रामस्थांनी गैरसोय दूर होणार आहे.परंतु गेले चार महिने ग्रामस्थांची गैरसोय निर्माण करणार्‍या पाटबंधारे विभागाने कारभारात सुधारणा करण्याची गरज आहे.
भोईर, सरपंच,ग्रुप ग्रामपंचायत, दहिसर-कुडे-गुंदावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -