घरपालघरलपलेले खड्डे पावसाने दाखवले, नव्याने उद्धाटन झालेल्या वर्सोवा पुलावर खड्डे

लपलेले खड्डे पावसाने दाखवले, नव्याने उद्धाटन झालेल्या वर्सोवा पुलावर खड्डे

Subscribe

तर सदरील उड्डाणपुलाला वापरले जाणारे हे साहित्य अत्यंत नित्कृष्ठ दर्जाचे वापरले असल्याने त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी व संबंधित अभियंत्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

भाईंदर :- मुंबई -अहमदाबाद महामार्गावर असलेल्या वसई खाडीवर बांधण्यात आलेल्या नवीन वर्सोवा पूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर २८ मार्चला वाहन चालकांसाठी एक मार्गिका खुली करण्यात आलेली आहे. या वर्सोवा पुलावर पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी अत्यंत नित्कृष्ठ दर्जाचे साहित्य वापरून उड्डाणपुलाचे काम केल्याने तीन महिन्यांच्या आतच खड्डे पडल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. खड्डे पडल्यामुळे व वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर सदरील उड्डाणपुलाला वापरले जाणारे हे साहित्य अत्यंत नित्कृष्ठ दर्जाचे वापरले असल्याने त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी व संबंधित अभियंत्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

नव्याने सुरू करण्यात आलेला उड्डाणपूल हा सह्याद्री हॉटेलसमोरील वेलकर पेट्रोल पंपापासून सुरू होऊन ससूनवगरपर्यंत आहे. त्याची लांबी जवळपास २ किलोमीटर आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वसई खाडीवर नवीन पुलाचे काम २०१८ पासून सुरु करण्यात आले होते. कोरोनाच्या काळात काम बंद राहिले तसेच काही इतर तांत्रीक अडचणीमुळे या कामाला उशीर झाला. २८ मार्चपासून पुलाची एक लाईन सुरू करण्यात आली आहे. या पुलावर पडलेले खड्डे लवकरात लवकर भरले नाहीतर पावसाळ्यात आणखी मोठे खड्डे पडून दुचाकी व इतर वाहनाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे व पुलावर पडलेले खड्डे लवकर भरावेत व अपघात होण्यापासून टाळावे अशी मागणी करण्यात येत आहे. तर मीरा-भाईंदर महापालिका व वसई -विरार महापालिका तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व इतर संबंधित विभागांशी पत्र व्यवहार करून संपर्क साधून लवकरात लवकर पुलावर, रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यास सांगण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त मुख्यालय प्रकाश गायकवाड यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया,

नवीन वर्सोवा उड्डाणपुलावर खड्डे पडल्याप्रकरणी संबंधित काम करणारे ठेकेदार व्हि.एम.सी. कंपनी व एन. जी. कंपनीच्या संयुक्त ठेकेदारांना नोटीस काढली असून कामाच्या गुणवत्तेबाबत सुद्धा चौकशी करणार आहोत. तसेच आम्ही सुद्धा खड्डे भरणे केले आहेत. पावसाचा जोर जास्त असल्याने तात्पुरते त्यावर कोल्डमिक्स वापरणार आहोत आणि पावसानंतर परमनंट सोल्युशन करणार आहोत.

- Advertisement -

– सुमित कुमार काडीयन, मुख्य मॅनेजर,मुंबई – अहमदाबाद महामार्ग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -