घरपालघरमी नगरसेवक, मला ओळखले का ?

मी नगरसेवक, मला ओळखले का ?

Subscribe

त्यानंतर त्या इसमाने त्यांना बोलण्याचे नादात त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व सोन्याची अंगठी काढून त्याला दिली.

भाईंदर :- भाईंदर पश्चिमेला राहणार्‍या इसमाला कामावरून घरी जात असताना रस्त्यामध्ये मी नगरसेवक आहे मला ओळखले का असे सांगत हातचलाखीने त्याच्या गळ्यातील चैन व हातातील अंगठी घेऊन दोन अज्ञात व्यक्तींनी पोबारा केला आहे. त्याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाईंदर पश्चिमेच्या व्यंकटेश्वर पार्क येथे राहणारे कमलेश बाबुलाल शाह (५९) राहतात. ते बीकेसी , बांद्रा येथे हिरे कंपनीत काम करत असून ते कामावरून सायंकाळी ५ वाजता भाईंदर स्टेशन वरून घरी जात होते. ६० फूट रोड येथे उतरून घरी चालत जात असताना रस्त्यावर एक इसम समोरून त्यांच्याकडे आला. त्याने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून मला ओळखलेस का ? मी इथला नगर सेवक आहे. हवे तर ह्याला विचार” असे सांगून बाजूने जाणार्‍या इसमाकडे हात दाखवला त्या दुसर्‍या इसमाने त्यांच्याकडे पाहत “ये नगर सेवक है, यहा सब जानते है ” असे सांगितले. त्यानंतर त्या इसमाने त्यांना बोलण्याचे नादात त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व सोन्याची अंगठी काढून त्याला दिली.

त्याने ती सांभाळून ठेवा ईथे खूप चोर्‍या होतात, असे सांगून त्यांची चैन व अंगठी त्यांच्या खिशात टाकल्यासारखे केले व त्यानंतर ते दोघे तेथून निघून गेले. थोडे पुढे गेल्यावर काही वेळाने शहा यांना संशय आला म्हणून त्यांनी खिसा तपासला असता खिशात दागीने कोठेही मिळून आले नाही. त्यानंतर त्यांनी त्या दोन अज्ञात इसमांचा शोध घेतला. परंतु ते कोठेही दिसले नाहीत. त्या दोन अज्ञात इसमांनी फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यांची सोन्याची चैन व अंगठी असे २० ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन त्या दोघांनी पोबारा केला. त्या दोघांविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -