घरक्राइममालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : प्रज्ञा ठाकूरसह आरोपींना सोमवारी रहावे लागणार कोर्टात हजर

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : प्रज्ञा ठाकूरसह आरोपींना सोमवारी रहावे लागणार कोर्टात हजर

Subscribe

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील सर्व साक्षीदारांचे जबाब पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने 25 सप्टेंबरपासून कलम 313 अंतर्गत आरोपींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात करणार आहे.

मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या 2008 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींना सोमवारी (25 सप्टेंबर) न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (Malegaon blast case Accused along with Pragya Thakur will have to appear in court on Monday)

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील सर्व साक्षीदारांचे जबाब पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने 25 सप्टेंबरपासून कलम 313 अंतर्गत आरोपींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात करणार आहे. या खटल्यात एकूण 323 जणांनी साक्ष दिली आहे. या साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे 25 सप्टेंबरपासून न्यायालय आरोपींची चौकशी करणार असून, त्यांचे जबाब नोंदवणार आहेत.

- Advertisement -

सर्व आरोपी जामिनावर

29 सप्टेंबर 2008 रोजी महाराष्ट्रातील मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जण ठार आणि 101 जखमी झाले होते. या प्रकरणात साध्वी प्रज्ञा ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह एकूण सात आरोपी आहेत. सर्व आरोपी जामिनावर आहेत. या प्रकरणातील पहिल्या क्रमांकाची आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर असून, त्या मध्य प्रदेशातील भोपाळ येथील खासदार आहेत. त्यांच्याशिवाय या प्रकरणात निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, सुधाकर द्विवेदी उर्फ ​​दयानंद पांडे आणि सुधाकर चतुर्वेदी हे आरोपी आहेत.’

हेही वाचा : संयुक्त राष्ट्राकडून भारताचे कौतुक; ‘या’ कारणामुळे होत आहे शुभेच्छांचा वर्षाव

- Advertisement -

काय आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण?

29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री 9.35 च्या सुमारास मालेगाव येथील शकील गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनीसमोर बॉम्बस्फोट झाला होता. एलएमएल मोटरसायकलमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 101 जण जखमी झाले होते. स्फोटानंतर 30 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावच्या आझाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : Canada-India Crisis: कॅनडाचे एक पाऊल मागे; भारतविरोधी पोस्टर, बॅनर हटविण्याचे आदेश

या प्रकरणात ही लावली होती कलमं

हे प्रकरण दहशतवादाशी संबंधित असल्याने, महाराष्ट्र सरकारच्या आदेशानंतर, महाराष्ट्र एटीएसने या प्रकरणाचा तपास हाती घेतला आणि 21 ऑक्टोबर 2008 रोजी एफआयआरमध्ये UAPA आणि MCOCA ची कलमे लावण्यात आली. तपासादरम्यान, 20 जानेवारी 2009 रोजी, महाराष्ट्र एटीएसने या प्रकरणात पहिले आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये 11 जणांना अटक करण्यात आली होती आणि तीन जणांना फरार दाखवण्यात आले होते. 21 एप्रिल 2011 रोजी एटीएसने या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -