घरपालघरव्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांना गुंतविण्यासाठी शक्कल लढवली..पण अखेर आरोपी सापडले

व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांना गुंतविण्यासाठी शक्कल लढवली..पण अखेर आरोपी सापडले

Subscribe

१ गावठी पिस्टल व ६ जिवंत काडतुस मिळून आले. सदर बाबत नयानगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह महा. पोलीस अधिनियम ३७(१) (क), १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

भाईंदर :- व्यावसायिक प्रतिस्पर्धींना गुंतविण्यासाठी प्रतिस्पर्धी व्यावसायिकाच्या दुकानात जाणीवपूर्वक अग्नीशस्त्रे व जिवंत ५९ काडतुसे ठेवणाऱ्या तसेच इतर प्रतिस्पर्धी व्यावसायिकांच्या दुकानात ठेवण्यासाठी अग्नीशस्त्रे व जिवंत काडतुस स्वतःजवळ बाळगणाऱ्या आरोपींना काशीमिरा गुन्हे शाखा कक्ष १ व काशिमिरा पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे.  ३० मार्च रोजी पोलीस हवालदार सावंत यांना मिळाली की, गोल्डन नेस्ट सर्कल जवळ असणार्या अलम स्टील अँड फर्नीचर, येथे काम करणार्या इसमांकडे विनापरवाना पिस्टल व जिवंत राउंड आहेत. सदरची माहिती त्यांनी वरिष्ठांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर ठिकाणी जाउन शहनिशा करता व्यक्ती फिरोज आलम शफीऊल्ला चौधरी (वय-३९ वर्षे, व्यवसाय व्यापार)यांच्या ताब्यात १ गावठी पिस्टल व १० जिवंत काडतुस तर दुसरा आरोपी शाकीर अब्दुल वहाब चौधरी (वय-३८ वर्षे, व्यवसाय नोकरी) याच्या ताब्यात १ गावठी पिस्टल व ६ जिवंत काडतुस मिळून आले. सदर बाबत नयानगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह महा. पोलीस अधिनियम ३७(१) (क), १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर दोन्ही इसमांकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी माहिती दिली की, फिरोज ऊर्फ इब्राहीम आलम शफीऊल्ला चौधरी याला व्यवसायामध्ये अमान स्टिल किचन इक्वीपमेंटचा मालक अनिस ऊर्फ मुन्ना खान , अमान स्टिल किचन इक्वीपमेंटचा मालक कमिल खान ऊर्फ कलिम आणि शादाब स्टिलचा मालक शादाब यांच्यामुळे भरपूर नुकसान झाले. त्यांना धडा शिकविण्यासाठी त्याच्या ओळखीचा व त्याच्याकडे पूर्वी काम करणारा मुस्लीम (रा. उत्तन ठाणे) याच्या करवी त्याने ६ गावठी पिस्तुले व जिवंत काडतुसे मागविले. त्यापैकी दोन गावठी पिस्तुले व जिवंत राऊंड तीन दिवसांपूर्वी त्याने स्वतः अनिस ऊर्फ मुन्ना खान याच्या अमान स्टिल किचन इक्वीपमेंट या दुकानातील वडापाव/पाणीपुरी साठीचे काऊंटरच्या कपाटामध्ये ठेवले. तर दोन पिस्तुले व १२ राऊंड त्याने एका सॅक बॅगेमध्ये ठेवून ते वर्सोवा पुलावरुन खाडीत फेकून दिले. तसेच त्याच्याकडे सापडलेले पिस्तुल व राऊंड तो एक दोन दिवसात अमान स्टिल किचन इक्वीपमेंटचा मालक कमिल खान ऊर्फ कलिम याच्या दुकानात ठेवणार होता. तसेच शाकीर अब्दुल वहाब चौधरी याच्या ताब्यात मिळून आलेले पिस्तुल व राऊंड तो एक दोन दिवसात शादाब स्टिलचा मालक शादाब याच्या दुकानात ठेवणार होता अशी माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पडताळणी करता, आरोपीतांनी अनिस ऊर्फ मुन्ना खान याचे अमान स्टिल किचन इक्वीपमेंट या दुकानातून सोहमकुमार यांना विक्री केलेल्या वडापाव/पाणीपुरी साठीच्या काऊंटरच्या कपाटामध्ये मिळून आलेल्या २ गावठी पिस्टल व ४३ जिवंत राउंड संदर्भात काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाले.
आतापर्यंत सदर कारवाईमध्ये एकूण ४ गावठी पिस्टल व ५९ जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले आहेत.सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उप-आयुक्त गुन्हे अविनाश अंबुरे, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ व विजयकुमार मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे व पुष्पराज सुर्वे, सहायक फौजदार संदीप शिंदे, पोलीस हवालदार अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, सचिन हुले, सचिन सावंत, विजय गायकवाड, सुधीर खोत, विकास राजपुत, पोलीस शिपाई प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी, गौरव बारी, धिरज मेंगाणे तसेच काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे व हवालदार मोहिले यांनी केली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -