घरक्रीडाRohit Sharma : मुंबईचा राजा रोहित शर्मा..., वानखेडेबाहेर चाहत्यांकडून घोषणाबाजी, व्हिडीओ व्हायरल

Rohit Sharma : मुंबईचा राजा रोहित शर्मा…, वानखेडेबाहेर चाहत्यांकडून घोषणाबाजी, व्हिडीओ व्हायरल

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 17 व्या पर्वातील चौदावा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सुरू आहे. या पर्वात पहिल्यांचा मुंबई घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेड मेदानात हा सामना खेळत आहे. या सामन्यातील सध्यस्थिती पाहता मुंबईची फलंदाजी पूर्ण झाली असून 126 धावांचे आव्हान राजस्थान समोर आहे.

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 17 व्या पर्वातील चौदावा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सुरू आहे. या पर्वात पहिल्यांचा मुंबई घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेड मेदानात हा सामना खेळत आहे. या सामन्यातील सध्यस्थिती पाहता मुंबईची फलंदाजी पूर्ण झाली असून 126 धावांचे आव्हान राजस्थान समोर आहे. मात्र, या सामन्यापूर्वी अनेक घोषणाबाजी वानखेडेच्या मैदानात पाहायला मिळाल्या. यामध्ये सातत्याने माजी कर्णधार रोहित शर्माच्या बाजून घोषणाबाजी दिल्या जात होत्या. यातील एक घोषणा म्हणजे ‘मुंबईचा राज रोहित शर्मा’ अशी घोषणाबाजी सुरु होती. (MI fans started gathering outside of wankhede stadium mumbai ka raja rohit sharma)

कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स यंदाच्या पर्वातील तिसरा सामना आज खेळत आहे. मुंबईला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पहिल्या विजयासाठी मुंबईचा संघ वानखेडे मैदानात खेळत आहे. या सामन्यापूर्वी वानखेडे मैदानाबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमली आहे. रोहित शर्माच्या चाहत्यांची घोषणाबाजी सुरू होती. वानखेडेच्या मैदानामबाहेर रोहित शर्माच्या चाहत्यांकडून ‘मुंबईचा राज रोहित शर्मा’ अशी घोषणाबाजी सुरु होती.

- Advertisement -

या घोषणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. रोहित शर्माच्या नावाची जर्सीही अनेकांनी घातली आहे. वानखेडेबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. काहींनी पांड्याविरोधात घोषणाबाजीही केली. हार्दिक पांड्याला मुंबईची धुरा दिल्यानंतर रोहित शर्माचे चाहते नाराज झाले असून, मुंबईच्या पहिल्या दोन्ही सामन्यात चाहत्यांनी हार्दिक पांड्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले.

- Advertisement -

दरम्यान, अहमदाबाद आणि हैदराबाद येथे झालेल्या दोन्ही सामन्यात हार्दिक पांड्याविरोधात घोषणाबाजी झाली. त्याशिवाय रोहित शर्माचा आदर करणारे पोस्टरही झळकले. दरम्यान, मुंबई इंडियन्समध्ये दोन गट पडल्याच्या चर्चाही सुरु आहेत. याचा फटका संघाच्या कामगिरीवर बसण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – IPL 2024 : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अश्विन रचणार इतिहास; वाचा सविस्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -