घरपालघरअतिवृष्टीमुळे जव्हार ते वाळवंडा महामार्ग खचल्याने वाहतूक जोखमीची

अतिवृष्टीमुळे जव्हार ते वाळवंडा महामार्ग खचल्याने वाहतूक जोखमीची

Subscribe

त्यामुळे या वळणावर सूचना फलक, रस्त्यावर रेडियम व रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक भिंत बांधणे आदी सोयींसाठी मागणी होत आहे.

जव्हार: जव्हार शहरापासून मुंबई रस्त्याला १२ ते १४ किलो मीटर अंतरावर वाळवंडा गावानजीक घाट रस्त्याला एका वळणावर रस्ता खचला असून बाजूला खोल दरी निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती असताना वाहन चालकांना आपला जीव जोखमीत घालून वाहन चालवावे लागत आहे. दरम्यान या बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात संपर्क केला असता हा राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

हा मार्ग पूर्णतः घाटाचा असून या भागात पावसाळ्यात सायंकाळी सात वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत दाट प्रमाणात धुके असते. अशा वेळी अनेक दुर्घटना घडून अनेकांचे प्राण गेले आहेत.शिवाय काहींना हात, पाय मोडून कायमचे अपंगत्व देखील आले आहे. त्यामुळे या वळणावर सूचना फलक, रस्त्यावर रेडियम व रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक भिंत बांधणे आदी सोयींसाठी मागणी होत आहे.

- Advertisement -

कोट

मुंबई-अहमदाबाद हा मुंबई, पालघर,डहाणू व गुजरातला जाण्याचा महत्वाचा राज्य मार्ग आहे. याच मार्गाहून बरेच लोकप्रतिनिधी प्रवास करीत असतात. परंतु त्यांच्या निदर्शनास ही बाब निवडणुका जवळ येताच येईल परंतु तोपर्यंत अनेक दुर्घटना होणे नाकारता येत नाही.

- Advertisement -

– नासिर शेख,ज्येष्ठ नागरिक

 

जव्हार ते वाळवंडा घाट रस्त्यात एका वळणावर रस्ता खचल्याचे कळाले असून त्यासंदर्भात उपाय योजना करण्याच्या सूचना संबंधित ज्युनिअर इंजिनिअर ला दिल्या आहेत.
– ज्योती शिंदे,कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग,ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -