घरपालघरन्यायालयाच्या इमारतीला न्याय द्या

न्यायालयाच्या इमारतीला न्याय द्या

Subscribe

.मात्र या प्रस्तावित ३ कोटी रुपयांमध्ये ही इमारत पूर्ण झाली नाही. त्यामुळे या इमारतीचे काम अपुरे राहिले.

जव्हार: जव्हार शहरात राजे यशवंतराव मुकणे महाराज यांच्या संस्थान काळातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील काही वास्तूंपैकी एक इमारत ही न्यायदान करणार्‍या न्यायालयासाठी देण्यात आली होती. परंतु आता ही वास्तू शंभर वर्षे पुरातन झाल्याने जीर्ण होत चालली आहे.यामुळे काही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाने सन २०१४ साली नवीन इमारत बांधण्यासाठी ३ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र या प्रस्तावित ३ कोटी रुपयांमध्ये ही इमारत पूर्ण झाली नाही. त्यामुळे या इमारतीचे काम अपुरे राहिले. एकंदरीत पाहिले तर या इमारतीच बांधकाम ८ वर्षे जुने झाले असून आजही अर्धवट परिस्थितीत पाहायला मिळते. इमारत पडीक झाली असून वीट बांधकाम कोसळले आहे. भिंतींना सर्वत्र शेवाळ आले असून भिंती काळ्या पडल्या आहेत. प्राणी व पक्ष्यांच्या राहण्याचे ठिकाण ही अर्धवट इमारत झाली आहे.

न्यायालयाच्या इमारतीला सन २०२२ मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून, लवकरच पुढील निविदेबाबतची कारवाई केली जाईल.
श्रीपाद शिंदे , कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -