घरपालघरघोडबंदर गावात माकड विरूद्ध माणूस संघर्ष

घोडबंदर गावात माकड विरूद्ध माणूस संघर्ष

Subscribe

यावेळी गावकर्‍यांनी एकत्र येत माकडांच्या निर्बीजीकरण ( नसबंदी) चा पर्याय सुचवला आहे. याबाबत वरिष्ठांना ही माहिती कळवून त्यांच्या मार्गदशनानुसार काम करणार असल्याचे वन विभागाने बैठकीत सांगितले.

भाईंदर :- मीरा -भाईंदर शहरात ऐतिहासिक घोडबंदर किल्ला आहे. या किल्ल्याच्या आसपास राहणार्‍या वस्तीला घोडबंदर गाव म्हणून ओळखले जाते. या घोडबंदर गावाच्या आजूबाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. त्यामुळे गावामध्ये माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या माकडांनी गावात उच्छाद मांडला आहे. या गावकरी त्रस्त झाले आहेत. हा त्रास दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी वनविभागाकडे नसबंदी करण्याची मागणी केली. त्यावर वन विभागाकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. माकडांच्या त्रासापासून सुटका व्हावी यासाठी गावाकर्‍यांनी वन-विभागाकडे मदतीची मागणी केली होती. त्यानुसार ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वनविभागाने काही दिवसापूर्वी गावात बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी माकडावर कोणतेही कठोर हिंसाचारक पाऊल उचलणे शक्य नसल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. यावेळी गावकर्‍यांनी एकत्र येत माकडांच्या निर्बीजीकरण ( नसबंदी) चा पर्याय सुचवला आहे. याबाबत वरिष्ठांना ही माहिती कळवून त्यांच्या मार्गदशनानुसार काम करणार असल्याचे वन विभागाने बैठकीत सांगितले.

 

- Advertisement -

माकडांच्या दहशतीमुळे गावातील नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे. नागरिकांना दररोज आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे या त्रासापासून सुटका व्हावी यासाठी सर्व गावकर्‍यांनी एकत्र येऊन माकडांची नसबंदी करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे.

– चंद्रकांत वैती – ग्रामस्थ, तथा माजी उपमहापौर

- Advertisement -

याबाबत गावकर्‍यांकडून आमच्याकडे लेखी स्वरूपात कोणत्याही मागणीचे पत्र आलेले नाही. याबाबत कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार वरिष्ठांना आहे. त्यामुळे वरिष्ठ याबाबत आपल्याला योग्य ती माहिती देतील.

राकेश भोईर ,वन क्षेत्र अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -