घरपालघरManor News:निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून मतदान केंद्राची पाहणी

Manor News:निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून मतदान केंद्राची पाहणी

Subscribe

पाहणी दरम्यान मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था,पिण्याचे पाणी,रॅम्प आणि शौचालय आदी सुविधांचा आढावा घेण्यात आला.

मनोर: निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून पालघर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.20 मे रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.मतदानाच्या तयारीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाची लगबग सुरू आहे.पालघर लोकसभा मतदारसंघातील बोईसर विधानसभा क्षेत्रा अंतर्गत 399 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.पालघर आणि वसई तालुक्यात विभागलेल्या मतदार संघात दुर्गम भागात मतदान केंद्रे असल्याने मतदान प्रक्रिया पार पडणारे कर्मचारी आणि मतदारांना किमान सुविधा उपलब्ध करून देण्याच्या निवडणूक आयोगाचे निर्देश असल्याने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून मतदान केंद्रांना भेटी देत पाहणी केली जात आहे. पाहणी दरम्यान मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था,पिण्याचे पाणी,रॅम्प आणि शौचालय आदी सुविधांचा आढावा घेण्यात आला.सुविधांची कमतरता आढळलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान घेण्याच्या दिवसापर्यंत सुधारणा केल्या जाणार असल्याची माहिती बोईसर विधानसभा क्षेत्राचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुनील माळी यांनी दिली.लोकसभा मतदारसंघातील मतदानासाठी मतदान केंद्रांवर पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बोईसर विधानसभा क्षेत्रातील 399 मतदान केंद्रांना भेटी देण्यात आल्या.मतदान केंद्रांवरील विजेची व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि शौचालय आदी सुविधांची पाहणी केल्यानंतर मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहेत.मतदान केंद्रांच्या पाहणी दौर्‍यात पालघर तालुक्यातील मंडळ अधिकारी आणि तलाठी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -