घरपालघरडॉक्टरवर एमआरटीपीचा गुन्हा

डॉक्टरवर एमआरटीपीचा गुन्हा

Subscribe

उजेडात आल्यावर संबंधितांना बांधकाम निष्कासित करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले नाही.

वसईः वसई विरार महापालिकेची कोणतीही परवानगी न घेताच बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात डॉक्टरसह दोन जणांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. दीपक भारद्वाज आणि नसीम अहमद खान अशी त्यांची नावे आहेत. महापालिकेच्या पेल्हार प्रभाग समितीच्या हद्दीत संतोष भवन येथे नसीम अहमद खान यांच्या मालकीच्या जागेत डॉ. दीपक भारव्दाज यांनी तळमजला अधिक तीन मजल्याची इमारती बांधून त्याठिकाणी आरती हॉस्पीटल सुरु केले आहे. ही इमारत बांधण्यासाठी वसई- विरार महापालिकेची कोणतीही परवानगी बांधकाम परवानगी घेतली नसल्याचे उजेडात आल्यावर संबंधितांना बांधकाम निष्कासित करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले नाही.

त्यामुळे सहाय्यक आयुक्त मोहन संखे यांनी अखेर पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पेल्हार पोलिसांनी डॉ. दीपक भारव्दाज आणि नसीम खान यांच्याविरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे इमारत अनधिकृत असतानाही महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने हॉस्पीटल सुरु करण्याची परवानगी दिली होती. इतकेच नाही तर त्यासाठी महापालिकेच्या अग्नीशमन विभागानेही ना हरकत दाखला देण्याचे काम केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -