घरपालघरजिल्ह्यात पुढील काही दिवस रखरखीचे

जिल्ह्यात पुढील काही दिवस रखरखीचे

Subscribe

मान्सून हंगामात पालघर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २१३५.९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तशी माहिती कृषि विज्ञान केंद्र येथील जिल्हा कृषि हवामान केंद्राकडून प्राप्त झाली.

पालघर: १० ऑगस्ट रोजी भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेल्या विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार संपूर्ण कोकणासह पालघर जिल्ह्यात पुढील आठवड्यात (११-१७ ऑगस्ट) हलक्या ते मध्यम स्वरूपात (सरासरी पेक्षा कमी) पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. कमाल व किमान तापमान १-२ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. वार्‍याचा वेगही जास्त राहण्याची शक्यता असून सरासरी १५-२० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. त्यानंतर दिनांक १८ ते २४ ऑगस्ट दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचे संकेत असताना पावसाची आकडेवारी सरासरी एवढी किंवा सरासरीपेक्षा कमी असेल आणि २५ ऑगस्टपासून पुढे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महावेधच्या आकडेवारीनुसार पालघर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी २१६.० मिमी पडतो तर १० ऑगस्टपर्यंत ७७.१ (३५.७%) मिमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सून हंगामात पालघर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २१३५.९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तशी माहिती कृषि विज्ञान केंद्र येथील जिल्हा कृषि हवामान केंद्राकडून प्राप्त झाली.

बाह्य स्तोत्रातून पाणी पुरवावे

- Advertisement -

पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आणि तापमान जास्त राहणार असल्याने भात खाचरात पाण्याची पातळी कमी होवू शकते. त्यामुळे भात खाचरात बांध बंधिस्ती करून पाण्याची पातळी ५ सें.मी.पर्यंत नियंत्रित करावी आणि पाण्याची गरज पडल्यास बाह्य स्तोत्रातून पाणी पुरवावे. खते देणे व फवारणीची कामे पावसाचा अंदाज घेवून उघडीप असताना पूर्ण करून घ्यावी,असा सल्ला कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल येथील प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -